उपनगरी रेल्वे मार्गावर होणारा रविवारचा ब्लॉक, नव्या लांब पल्ल्याच्या गाडय़ा, प्रतीक्षा यादी आणि यासारखी माहिती आता प्रवाशांना त्यांच्या मोबाइलवरच मिळणार आहे. पश्चिम रेल्वेने ही अत्याधुनिक सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध केली असून यामुळे प्रवाशांना आपल्या प्रवासाची आखणी करणे सोयीचे होणार आहे. सध्या ३० लाख प्रवासी मोबाइलवरील एम इंडिकेटरचा वापर करून रेल्वेच्या गाडय़ांची तसेच वाहतुकीबाबतची माहिती घेत असतात.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रवाशांना रेल्वेच्या विविध सेवांची आणि गाडय़ांची माहिती देण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. मोबाइलमधील विविध सॉफ्टवेअर्स बनविणाऱ्यांशी संपर्क साधून ही योजना बनविण्यात आली आहे. या सॉफ्टवेअरमध्येच ६१४स्र्िं३ी२ हे सॉफ्टवेअर समाविष्ट करण्यात आले आहे. मोबाइलमध्ये असलेल्या आणि सध्या ३० लाखांहून अधिक प्रवासी वापर करीत असलेल्या एम इंडिकेटरमध्येच एक ‘रेल अलर्टस्’ हे वेगळे चिन्ह असेल, ज्यामध्ये पश्चिम रेल्वेची नवनवीन माहिती, नव्या गाडय़ा, विशेष गाडय़ा, ब्लॉक, लांब पल्ल्याच्या गाडय़ांच्या वेळा, त्या गाडय़ांमधील प्रतीक्षा सूचीची सद्यस्थिती, अतिरिक्त डबे लावण्याबाबतची माहिती आदी माहिती उपलब्ध होईल. कोणतेही वेगळे शुल्क न आकारता एम इंडिकेटर आपल्याला मोबाइलमध्ये घेता येते. त्यासाठी गुगल प्ले-स्टोअरवर जाऊन किंवा http://www.mobond.com ते आपल्या डाऊनलोड करता येते. आता पश्चिम रेल्वे स्वत:हून ही यंत्रणा विकसित करीत आहे.
आता रेल्वेची माहिती मिळणार मोबाइलवर
उपनगरी रेल्वे मार्गावर होणारा रविवारचा ब्लॉक, नव्या लांब पल्ल्याच्या गाडय़ा, प्रतीक्षा यादी आणि यासारखी माहिती आता प्रवाशांना त्यांच्या मोबाइलवरच मिळणार आहे. पश्चिम रेल्वेने ही अत्याधुनिक सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध केली असून यामुळे प्रवाशांना आपल्या प्रवासाची आखणी करणे सोयीचे होणार आहे
First published on: 23-01-2013 at 04:27 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railway information on mobile