मुंबई : मध्य रेल्वेच्या उशिराने धावणाऱ्या लोकलमुळे प्रवाशांना इच्छित स्थळी पोहचण्यास नेहमी विलंब होतो. तसेच वाढत्या गर्दीचा भार पेलू शकेल, इतक्या लोकल फेऱ्या सध्या धावत नाही. परंतु, ‘होम प्लॅटफाॅर्म’ नसताना देखील घाटकोपर-सीएसएमटी लोकल चालवण्यात येत असल्याने प्रवासी संघटनांनी रोष व्यक्त केला आहे. घाटकोपर-सीएसएमटी अप आणि डाऊन अशा सहा लोकल फेऱ्या चालवण्यात येतात. त्यामुळे मध्य रेल्वेचा वक्तशीरपणा ढासळत आहे. तसेच ठाणे ते डोंबिवली दरम्यान वाढत्या गर्दीमुळे प्रवाशांचे जीव जात आहेत. त्यामुळे नव्या वेळापत्रकात घाटकोपर-सीएसएमटी लोकलचा विस्तार ठाणे किंवा डोंबिवलीपर्यंत करण्याचे मत प्रवासी संघटनांनी केले आहे.

हेही वाचा >>> रेवस ते रेड्डी सागरी किनारा मार्ग, एमएसआरडीसीच्या दोन खाडीपूलाच्या कामाच्या निविदेला चांगला प्रतिसाद

Ignorance of Municipal Corporation and Traffic Police Department towards not working traffic signal
नागपूर : बंद वाहतूक सिग्नल; वाहनचालकांना मन:स्ताप, महापालिका-वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Pune Blockade, Reckless driving, crime pune,
शहरबात : नाकाबंदीचे फलित
Metro stopped, Metro Mumbai, MMRC Mumbai,
दोन स्थानकांमध्ये भुयारात मेट्रो बंद, एमएमआरसीकडून प्रवाशांची सुखरूप सुटका
Railway Accident in bihar
Railway Worker Crushed : एक्स्प्रेस पुढे जाण्याऐवजी मागे आली अन् रेल्वे कर्मचारी चिरडला; बिहारमध्ये भीषण अपघात!
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
cash seized south mumbai ahead of assembly elections in maharashtra
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईत कारवाई ; सव्वा दोन कोटींची रोख जप्त
western railway recovers 80 crore fine from ticketless passengers
विनातिकीट प्रवाशांकडून ८० कोटींची दंडवसुली; सात महिन्यांतील पश्चिम रेल्वेची कारवाई

मध्य रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाच्या कळवा-ऐरोली लिंकचे काम अनेक वर्षे रखडलेले आहे. कळवा करशेडची लोकलमध्ये कळव्याच्या नागरिकांना चढता यावे, यासाठी ‘होम प्लॅटफॉर्म’ साठी पाठपुरावा करून प्रशासन दुर्लक्ष करत आहेत. तसेच अनेक रेल्वे मार्गिकेचे काम रखडले आहे. त्यामुळे लोकल फेऱ्या वाढवण्यात अडचणी येत आहेत. परंतु, घाटकोपर-सीएसएमटी लोकल फेऱ्या चालवण्यासाठी १५ ते २० मिनिटांचा अधिकचा कालावधी वाया जातो. त्यामुळे या लोकलच्या मागील लोकलचे वेळापत्रक कोलमडते. फार वर्षांपासून घाटकोपर ते सीएसएमटी लोकल सेवा सुरू आहे. प्रवासी संघटना या लोकल फेऱ्यांचा विस्तार ठाण्यापर्यंत करण्याची मागणी करत आहे. मात्र रेल्वे प्रशासन मूग गिळून गप्प बसले आहे. या लोकलमुळे इतर लोकलचा वक्तशीरपणा ढासळत आहे. व्यापाऱ्यांसाठी धावणाऱ्या या लोकलमुळे नोकरदार वर्गाला फटका बसत आहे. घाटकोपर येथे ‘होम प्लॅटफॉर्म’ नसताना येथून लोकल चालवल्या जातात. येथे मोटरमन, ट्रेन मॅनेजरला सज्ज राहावे लागते. त्यामुळे दोन जणांचे जादा मनुष्यबळ तीन फेऱ्यांसाठी लावावे लागते, असे मुंबई रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष मधू कटीयन यांनी सांगितले.

हेही वाचा >>> मुंबई : म्हाडाच्या जागेवरील अनधिकृत फलक म्हाडा हटविणार

सकाळच्या वेळी घाटकोपर ते सीएसएमटी अप आणि डाऊन लोकल फेऱ्यांमुळे मध्य रेल्वेचा वक्तशीरपणा ढासळत आहे. या लोकलचा विस्तार केल्यास, घाटकोपरच्या प्रवाशांसह इतर प्रवाशांना फायदेशीर ठरेल. यासह मध्य रेल्वेचा वक्तशीरपणा सुधारून इतर फेऱ्या वाढविता येणे शक्य होईल. कळव्यावरून लोकल चालवण्यास नकार दिला जातो. कारण तेथे ‘होम प्लॅटफाॅर्म’ नाही. तर, घाटकोपर येथे ‘होम प्लॅटफाॅर्म’ नसताना लोकल फेऱ्या सुरू का ? सिद्धेश देसाई, अध्यक्ष, कळवा-पारसिक प्रवासी संघटना

‘होम प्लॅटफॉर्म’विना लोकल चालवणे गंभीर आहे. सहा लोकल फेऱ्यांमुळे इतर लोकलला विलंब होतो. त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने या लोकल रद्द करून, यावेळेत ठाणे, डोंबिवली, कल्याण येथील अप आणि डाऊन लोकल चालवणे आवश्यक आहे. – सुभाष गुप्ता, अध्यक्ष, रेल यात्री परिषद

या सकाळच्या सहा लोकल फेऱ्या रद्द किंवा विस्तार करण्याची प्रवाशांची मागणी

– सकाळी ८.३७, ९.०९, ९.५७ सीएसएमटी ते घाटकोपर लोकल

– सकाळी ९.१६, ९.४६, १०.३५ घाटकोपर ते सीएसएमटी लोकल