दिवा रेल्वे स्थानकालगतच्या मार्गावर उभारण्यात आलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बॅनर शुक्रवारी सकाळी रेल्वे सुरक्षा दलाने उतरविल्याने संतप्त अनुयायांनी या मार्गावरील धीमी वाहतूक तब्बल दीड तास रोखून धरली.
दादरच्या चैत्यभूमीकडे निघालेल्या दिव्यातील अनुयायांनी हे बॅनर उतरविणाऱ्या सुरक्षा दलाच्या जवानांसोबत वाद घातला. त्यामुळे दिवा स्थानकात तणाव निर्माण झाला होता.  या आंदोलनामुळे सकाळच्या वेळेत धीम्या मार्गावरील वाहतूक खोळंबल्याने १० लोकल रद्द कराव्या लागल्या. परिणामी अनेक प्रवाशांचे मोठय़ा प्रमाणावर हाल झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Story img Loader