मुंबई : मध्य आणि हार्बर रेल्वेवरील ओव्हर हेडवायर, सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे रुळांची दुरुस्ती करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर, पश्चिम रेल्वेवरील रविवारी कोणताही ब्लॉक नसेल.

हेही वाचा >>> फेरीवाल्यांविरोधातील कारवाईसाठी तोकडे मनुष्यबळ; मुंबई महानगरपालिका कंत्राटदाराकडून मनुष्यबळा घेणार

कुठे : माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर

कधी : सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत

परिणाम : सीएसएमटीवरून कल्याण दिशेकडे जाणाऱ्या धीम्या लोकल माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. तर ठाण्यावरून सीएसएमटीकडे जाणाऱ्या धीम्या लोकल मुलुंड ते माटुंगादरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. दोन्ही दिशेकडील लोकल शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील.

हेही वाचा >>> म्हाडा मुंबई मंडळ सोडत २०२३ :सोडतपूर्व प्रक्रियेचे नवीन वेळापत्रक जाहीर

कुठे : कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर

कधी : सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत परिणाम : हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते पनवेल / बेलापूर / वाशीदरम्यान धावणाऱ्या अप आणि डाऊन लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीत ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी / नेरुळ दरम्यान लोकल सेवा उपलब्ध असतील. सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल स्थानकांदरम्यान विशेष लोकल सेवा चालवण्यात येणार आहेत.

Story img Loader