मध्य रेल्वेवर विठ्ठलवाडी स्थानकाजवळ रेल्वेचा पेंटाग्राफ तुटल्याने कल्याण ते कर्जत मार्गावरील वाहतूक शुक्रवारी सकाळपासून ठप्प झाली होती. सुमारे पाच तासांनंतर दुपारी या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.
कल्याणकडून कर्जतकडे जाणारी आणि कर्जतकडून कल्याणकडे येणारी रेल्वे वाहतूक दुरुस्तीच्या कारणास्तव शुक्रवारी सकाळी बंद करण्यात आली होती, असे रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी ए. के. जैन यांनी सांगितले. या दुरुस्तीकामामुळे पुणे-मुंबई मार्गावरील रेल्वे वाहतूकही विस्कळीत झाली.
सुरुवातीला कर्जत ते कल्याण मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली. त्यानंतर दुपारी सव्वा वाजण्याचा सुमारास कल्याण ते कर्जत मार्गावरील वाहतूकही सुरळीत झाली.
विठ्ठलवाडी स्थानकाजवळ रेल्वेचा पेंटाग्राफ तुटल्यामुळे मध्य रेल्वेने शुक्रवारी सकाळी या मार्गावर मेगाब्लॉक घेतला होता.
(संग्रहित छायाचित्र)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा