मुंबई : बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात दोन दिवस ढगाळ हवामान राहण्याचा आणि तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरावर वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागरावरून प्रामुख्याने दक्षिण विदर्भ, दक्षिण मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात बाष्पयुक्त वारे येत आहेत. त्यामुळे या भागात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण : खटल्याची जलदगतीने सुनावणी घ्या आणि तो लवकरात लवकर निकाली काढा, उच्च न्यायालयाचे आदेश

या भागातील थंडीही या बाष्पयुक्त वाऱ्यामुळेच कमी झाली आहे. साधारण पुढील चार दिवस ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. तर मंगळवारी (१४ जानेवारी आणि बुधवारी (१५ जानेवारी) विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, हिमालयात बुधवारपासून (१५ जानेवारी) पश्चिमी विक्षोप (थंड वाऱ्याचा झंझावात) सक्रीय होण्याचा अंदाज आहे. त्याचा परिणाम म्हणून उत्तर भारतात पुन्हा थंडीत वाढ होण्याचा अंदाज आहे. थंड वाऱ्याचा जोर जास्त राहिल्यास उत्तर महाराष्ट्र, उत्तर विदर्भात किमान पारा खाली जाण्याचा अंदाज आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rain forecast for two days in vidarbha central maharashtra mumbai print news zws