गुजरातवर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढला आहे. उत्तर महाराष्ट्रात सावधानतेचा इशारा देण्यात आहे.
अरबी समुद्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा गुजरातवर सरकल्याने गुजरातसह राजस्थान, मध्य प्रदेश तसेच उत्तर महाराष्ट्रात दमदार पाऊस पडत आहेत. डहाणू येथे सोमवारी सकाळी साडेआठ ते संध्याकाळी साडेपाच दरम्यान १५० मिमी पावसाची नोंद झाली. गुजरातमध्येही बडोदा, गांधीनगर, बलसाड येथे मुसळधार पाऊस सुरू आहे. उत्तर महाराष्ट्रात नंदूरबार, धुळे, नाशिक, मालेगाव जिल्ह्यातही पावसाने चांगलाच जोर धरला. उत्तर महाराष्ट्रात येत्या दोन दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मात्र मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण या भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरी येतील, असा अंदाज मुंबई हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे

Story img Loader