मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर गुरुवारपासून संततधार पाऊस सुरू आहे. मुंबईमध्ये गुरुवारी रात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईतील मध्य, पश्चिम आणि हार्बर या तिन्ही मार्गावरील लोकल वाहतूक ठप्प झाली आहे. त्याचबरोबर सखल भागामध्ये पाणी साचल्याने रस्त्यावरील वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.
मुंबईसह कोकण किनारपट्टीवर झालेला पाऊस
सांताक्रुझ – १८७ मिमी (गुरुवारी रात्री आठ ते शुक्रवारी सकाळी आठ)
कुलाबा – १४२ मिमी (गुरुवारी रात्री आठ ते शुक्रवारी सकाळी आठ)
अलिबाग – २०५ मिमी (सकाळी आठ वाजता संपलेल्या गेल्या २४ तासांत)
मुरूड – २१० मिमी (सकाळी आठ वाजता संपलेल्या गेल्या २४ तासांत)
श्रीवर्धन – १६५ मिमी (सकाळी आठ वाजता संपलेल्या गेल्या २४ तासांत)
उरण – १७४ मिमी (सकाळी आठ वाजता संपलेल्या गेल्या २४ तासांत)
तळा – २२६ मिमी (सकाळी आठ वाजता संपलेल्या गेल्या २४ तासांत)
रत्नागिरी – ७१ मिमी (सकाळी आठ वाजता संपलेल्या गेल्या २४ तासांत)