शहरात पावसची सुरुवात होऊन आठ दिवस उलटले तरी पाणीपुरवठा करणा-या तलावांच्या क्षेत्रात पाऊस पडत नसल्याने गंभीर समस्या निर्माण झाली होती. मात्र शुक्रवारी संध्याकाळपासून पावसाने संपूर्ण कोकण परिसरासह पाणीपुरवठा करणा-या तलाव क्षेत्रातही संतत धार लावली. शुक्रवारी पावसाने सुरुवात केल्यानंतर भातसा धरण क्षेत्रात सकाळी सहा वाजेपर्यंत २४ तासात तब्बल १२३ मिमी पावसाची नोंद झाली. घोडपसागर मध्येही पावसाने बरसण्यास सुरुवात केल्याने तलावांमधील एकूण जलसाठा ४६३९ दशलक्ष लीटरने वाढला. त्यामुळे सध्या सुरु असलेल्या २० टक्के पाणीकपातीपासून मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे.
आज सकाळपर्यंत घोडपसागर ३३ मिमी, तानसा ५५ मिमी, अप्पर वैतरणा ५१ मिमी, भातसा १२३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. मध्य वैतरणामध्ये पावसाने अजूनही हजेरी लावलेली नाही. घोडपसागर ५६२५७ दशलक्ष जलसाठा होता तो आता ५६३३७ दशलक्षवर पोहचला आहे. तर ताणसात आधी ९३६७ दशलक्ष जलसाठा होता तो आता ९६४१ दशलक्ष, भातसामध्ये आधी १७२०३ दशलक्ष जलसाठा  होता तो आता २०२९१ दशलक्ष झाला आहे. मुंबईला रोज ३७०० दशलक्ष मिमी पाण्याची गरज लागते. मुंबईला जलसाठा करणा-या सर्व तलावांतील मिळून आधी ८७१८४ दशलक्ष इतका जलसाठा होता. मात्र, कालच्या पावसानंतर तो आज ९२८२३ दशलक्ष इतका झाला आहे. 

uran karanja road potholes
उरण-करंजा मार्गाची दुरवस्था कायम
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
if want vote then Save rivers trees and hills
मत हवं? नद्या, झाडे, टेकड्या वाचवा…
flat Palava Colony animals, Dombivli Palava Colony animals, Dombivli flat animals
डोंबिवली पलावा वसाहतीमधील अलिशान सदनिकेतून विदेशी वन्यजीव जप्त, ठाणे वन विभागाची कारवाई
mpcb issues notice to hinjewadi it park over functioning of common sewage treatment plan
हिंजवडी आयटी पार्कला जलप्रदूषणासाठी नोटीस; सामाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावर प्रदूषण नियंत्रण मंडळाचा ठपका
Voters in Malabar Hill insist on environment conservation in the wake of assembly elections 2024 mumbai print news
मलबार हिलमधील मतदार पर्यावरण संवर्धनासाठी आग्रही
Eurasian Water Cat Pune District, Indapur,
पुणे जिल्ह्यात प्रथमच दुर्मीळ ‘युरेशियन पाणमांजरा’चा शोध, इंदापूरमधील विहिरीमध्ये पडलेल्या पाणमांजराची सुटका
apmc premises free from traffic jams due to measures taken by the traffic police
एपीएमसी परिसर वाहतूक कोंडीमुक्त; वाहतूक पोलिसांच्या उपाययोजनांमुळे नागरिकांना दिलासा