शहरात पावसची सुरुवात होऊन आठ दिवस उलटले तरी पाणीपुरवठा करणा-या तलावांच्या क्षेत्रात पाऊस पडत नसल्याने गंभीर समस्या निर्माण झाली होती. मात्र शुक्रवारी संध्याकाळपासून पावसाने संपूर्ण कोकण परिसरासह पाणीपुरवठा करणा-या तलाव क्षेत्रातही संतत धार लावली. शुक्रवारी पावसाने सुरुवात केल्यानंतर भातसा धरण क्षेत्रात सकाळी सहा वाजेपर्यंत २४ तासात तब्बल १२३ मिमी पावसाची नोंद झाली. घोडपसागर मध्येही पावसाने बरसण्यास सुरुवात केल्याने तलावांमधील एकूण जलसाठा ४६३९ दशलक्ष लीटरने वाढला. त्यामुळे सध्या सुरु असलेल्या २० टक्के पाणीकपातीपासून मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे.
आज सकाळपर्यंत घोडपसागर ३३ मिमी, तानसा ५५ मिमी, अप्पर वैतरणा ५१ मिमी, भातसा १२३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. मध्य वैतरणामध्ये पावसाने अजूनही हजेरी लावलेली नाही. घोडपसागर ५६२५७ दशलक्ष जलसाठा होता तो आता ५६३३७ दशलक्षवर पोहचला आहे. तर ताणसात आधी ९३६७ दशलक्ष जलसाठा होता तो आता ९६४१ दशलक्ष, भातसामध्ये आधी १७२०३ दशलक्ष जलसाठा होता तो आता २०२९१ दशलक्ष झाला आहे. मुंबईला रोज ३७०० दशलक्ष मिमी पाण्याची गरज लागते. मुंबईला जलसाठा करणा-या सर्व तलावांतील मिळून आधी ८७१८४ दशलक्ष इतका जलसाठा होता. मात्र, कालच्या पावसानंतर तो आज ९२८२३ दशलक्ष इतका झाला आहे.
पाणीपुरवठा करणा-या तलावांवर पावसाची कृपादृष्टी
शुक्रवारी संध्याकाळपासून पावसाने संपूर्ण कोकण परिसरासह पाणीपुरवठा करणा-या तलाव क्षेत्रातही संतत धार लावली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 12-07-2014 at 02:38 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rain in mumbai water supplying lakes