मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. आज रविवार पहाटे पासून पावसाने चांगलाच जोर पकडला आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. मुंबईच्या लाईफलाईनवर पावसाचा तडाखा बसण्यास सुरूवात झाली आहे. मध्यरेल्वेची वाहतूक २० मिनिटे उशीराने सुरू आहे. विकेण्ड असल्यामुळे सुट्टीचा पावसाळी अनुभव घेण्यासाठी मुंबईकरांना चांगली संधी असली तरी, वाहतूकीवर परिणाम झाल्याने पावसाचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडणाऱया मुंबईकरांना वाहतूकीच्या गैरसोयीला सामोरे जावे लागू शकते. पावसासमोर मध्य रेल्वेच्या प्रशासनाने नांगी टाकली असून, अत्यावश्यक असेल तरच प्रवास करण्याची सुचना केली आहे. पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट- ग्रँटरोड दरम्यान रेल्वेट्रॅकवर पाणी साचल्याने रेल्वे वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाहतुकीचा बोऱ्या
सायन-पनवेल मार्गावर वाहतूकीचा खोळंबा झाला आहे. मीरारोडकडून उत्तनकडे होणारी वाहतूकही धीम्या गतीने सुरु आहे. सरवली परिसर ते भिवंडी दरम्यानही ट्राफीक जाम झाले आहे. तर, ठाण्यात अवघ्या पंधरा मिनिटांत पाच मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील ४८ तास अशीच पावसाची संततधार सुरू राहणार आहे.  

‘मुंबापुरी’ची ‘तुंबापुरी
मुंबई महापालिकेने मे महिन्यात खड्डय़ांमध्ये भरलेली डांबरमिश्रीत खडी पहिल्याच पावसात वाहून गेल्याने रस्ते खडबडीत झाले असून मुंबईकरांनी कररुपात पालिकेच्या तिजोरीत जमा केलेले लाखो रुपये ‘पाण्यात’ गेल्याचे चित्र आहे. हिंदमाता परिसरात अगदी गुडघ्यापर्यंत पाणी साचले आहे. तर, मुंबईतील सखल भागात कुर्ला परिसरातही पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. तसेच भायखळा आणि लोअर परळ भागातही पाणी साचले आहे.

पुण्याकडे जाणाऱया एक्स्प्रेस ट्रेन रखडल्या  
पावसाने आज शनिवार जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे पुण्याकडे जाणारी रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. ओव्हरहेड वायर तुटल्याने पुण्याकडे जाणाऱया सर्व एक्स्प्रेस ट्रेन रखडल्या आहेत. पुणे-लोणावळा लोकल गेल्या तासाभरापासून आकुर्डी चिंचवड दरम्यान मध्येच खोळंबली आहे.