बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या तीव्र स्वरुपाच्या कमी दाबाच्या पट्टय़ाचे रूपांतर वादळात होण्याची शक्यता असून येत्या दोन दिवसात ते आंध्र प्रदेश व ओडिसाच्या किनाऱ्यावर आदळण्याची शक्यता आहे. या वादळाच्या पाश्र्वभूमीवर मराठवाडय़ात येत्या २४ तासांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जमिनीवर आलेल्या वादळाच्या प्रवासाच्या दिशेनुसार पावसाची शक्यता कमी-अधिक होईल.
अंदमान आणि निकोबार बेटांवर मंगळवारी दुपारी अतीतीव्र स्वरूपाचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता. या पट्टय़ाचे बुधवारी चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता केंद्रीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. हे वादळ वायव्येकडे सरकणार असून दोन दिवसात आंध्र प्रदेश तसेच ओडीशाच्या किनाऱ्यावर आदळण्याची शक्यता आहे. या वादळामुळे अंदमान बेटांवर अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. समुद्रातून प्रवास करताना या वादळासोबत प्रचंड प्रमाणावर बाष्प येण्याची शक्यता असल्याने पूर्व किनारपट्टीवर सर्वत्र पावसाचा व धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. या वादळामुळे मराठवाडय़ातही २४ तासात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वादळ नेमके कोणत्या ठिकाणी जमिनीवर आदळेल व त्याचा प्रवास कोणत्या दिशेने होईल त्यावरून वादळाचा प्रभाव निश्चित होईल. सध्याच्या दिशेवरून मराठवाडय़ाला पावसाची शक्यता आहे. विदर्भही या वादळामुळे प्रभावित होऊ शकेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा