बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले फायलिन चक्रीवादळ पूर्व किनारपट्टीच्या दिशेने सरकत आहे. परिणामी विदर्भातील काही भागात अतिवृष्टी होण्याचा इशारा वेधशाळेकडून देण्यात आला आहे. या वादळाचा मुंबई व परिसरावर विशेष परिणार होणार नसून पुढील २४ तासांत पावसाच्या तुरळक सरी पडतील, असा अंदाज गुरुवारी मुंबई हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला. फायलिन चक्रीवादळाची दिशा व वेग पाहता १२ ऑक्टोबर रोजी ते ओडीसा तसेच आंध्र प्रदेशच्या उत्तर भागावर आदळण्याची शक्यता आहे. आग्नेय दिशेकडून आलेल्या वाऱ्यांसोबत आलेल्या बाष्पामुळे विदर्भात काही भागात अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबईत सरींची शक्यता
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले फायलिन चक्रीवादळ पूर्व किनारपट्टीच्या दिशेने सरकत आहे.
First published on: 11-10-2013 at 12:01 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rain possible in mumbai due to cyclone impact