बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ाने पावसाच्या माघारी परतण्याच्या वेळापत्रकात गोंधळ उडवून दिला आहे. मात्र, अजूनही आठवडाभर मान्सून रेंगाळण्याची शक्यता आहे.
 आग्नेयेकडून आलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यांनी मध्य व उत्तर भारतात पावसाच्या सरी पडत आहेत. राजस्थानमधून ९ सप्टेंबर रोजी पाऊस माघारी फिरला. मात्र त्यानंतर बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे तसेच बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे महाराष्ट्र, गुजरात व राजस्थानात पुन्हा पाऊस सुरू झाला. आताही उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून मध्य भारत, छत्तीसगढ, राजस्थान, दक्षिण भारतात पावसाच्या सरी पडतील. विदर्भातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे आणखी काही काळ पाऊस परत जाणार नाही. राज्यातून साधारणपणे ३० सप्टेंबरपर्यंत पाऊस बाहेर पडत असला तरी दरवर्षीचा पाऊस वेगळा असतो आणि यावेळी बंगालच्या उपसागरातून आलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यांनी पाऊस रेंगाळला. आणखी आठवडाभर तरी पावसाचे वातावरण कायम राहील, अशी माहिती मुंबई हवामानशास्त्र विभागाचे संचालक व्ही. के. राजीव यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा