लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: मुंबई आणि उपनगरांत बुधवारी पावसाने विश्रांती घेतली होती. तर धरणक्षेत्रात अत्यंत तुरळक पावसाची नोंद झाली. धरणक्षेत्रात पावसाने विश्रांती घेतली असली तरी पाणी साठ्यात मात्र वाढ झाली आहे. सातही धरणांमध्ये सध्या १८.२९ टक्के पाणीसाठा आहे.

The authority is taking possession of houses distributed to 21 people with fake documents
घर असतानाही पात्र झालेल्या २१ झोपडीवासीयांविरुद्ध कारवाई ! सर्व घरे ताब्यात घेणार!
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Municipal corporation issues notice to 28 constructions violating air pollution control regulations
वायू प्रदूषण नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या २८ बांधकामांना पालिकेची नोटीस
Air quality in Borivali and Malad is dangerous
बोरिवली, मालाडची हवा धोकादायक, महिन्यातील जवळपास वीस दिवस बहुतेक भागांत वाईट हवेची नोंद
Water supply to Ulhasnagar Ambernath Badlapur closed for 24 hours
बारवीच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात दुरूस्ती; उल्हासनगरसह अंबरनाथ, बदलापुरातील पाणी पुरवठा २४ तास बंद
Borivali air, Air pollution Mumbai, Air pollution Borivali,
बोरिवलीची हवा ‘अतिवाईट’, मुंबईत हवा प्रदूषणाचे सत्र सुरूच
Mumbai citizens suffer from cold and cough due to polluted air
प्रदुषित हवेमुळे मुंबईकर सर्दी, खोकल्याने त्रस्त
Unauthorized construction CIDCO proposal for Navi Mumbai
अनधिकृत बांधकामांना दंडाची पळवाट!  नवी मुंबईसाठी ‘सिडको’चा प्रस्ताव; सामाजिक कार्यकर्त्यांचा विरोधदंड आकारणी कशी असेल?

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाणीसाठ्यात दररोज मोठी वाढ होते आहे. मात्र गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असून प्रत्येक धरणात साधारण ६ ते २८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मात्र जमिनीतून झिरपणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे धरणांतील जलसाठ्यात वाढ होत आहे. गेल्यावर्षाच्या तुलनेत आज धरणांमध्ये जास्त पाणीसाठा आहे.

आणखी वाचा-समन्वय समिती प्रवेशासाठी मुंबई, ठाणे, पालघरच्या गोविंदांचा ‘थर’

उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सात धरणांमधून मुंबईला दर दिवशी ३८०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. सातही धरणांतील उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतकी आहे. १ ऑक्टोबर रोजी धरणांमध्ये इतका पाणीसाठा उपलब्ध असल्यास मुंबईकरांना वर्षभर पुरेसा पाणीपुरवठा करणे महानगरपालिकेला शक्य होते. अन्यथा फेब्रुवारी – मार्चदरम्यान मुंबईत पाणी कपात लागू करावी लागते. यंदा जूनच्या चौथ्या आठवड्यात सुरू झालेल्या पावसामुळे धरणांतील पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होऊ लागली. आठ दिवसांत पडलेल्या पावसाने पाणीसाठ्यात वाढ झाली. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे धरणक्षेत्रातही बुधवारी तुरळक पाऊस पडला. मात्र पाणीसाठा वाढत असून १८.२९ टक्क्यांवर पोहोचला आहे.

दोन वर्षांच्या तुलनेत पाणीसाठा

६ जुलै २०२३……२ लाख ६४ हजार ६५७ दशलक्ष लिटर…….१८.२९ टक्के

६ जुलै २०२२……२ लाख ३२ हजार ७४४ दशलक्ष लिटर……. १६.०८ टक्के

६ जुलै २०२१……२ लाख ७० हजार ९७० दशलक्ष लिटर…….१८.७२ टक्के

Story img Loader