आग्नेय मोसमी पावसाचा परिणाम
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नमिता धुरी
मुंबई : दक्षिण भारतात वाढलेला पाऊस आणि त्याचवेळी युरोपीय देशांकडे निर्माण होणारी वातावरणीय स्थिती (वेस्टर्न डिस्टर्बन्सेस) यांचा एकत्रित परिणाम म्हणून मुंबईत डिसेंबरच्या प्रारंभीही पावसाने हजेरी लावली असून यंदा मुंबईकरांनी वर्षभर पाऊस अनुभवला आहे. मोसमी पाऊस परतला असला तरी मुंबईत पावसाने वर्षभर मुक्काम केला आहे.
मुंबईत या वर्षांची सुरुवातच (२०२१) पावसाने झाली. ऋतू विभागणीनुसार मुंबईकर गुलाबी थंडीची प्रतीक्षा करत असताना ८ जानेवारीला मुंबईत सकाळीच पावसाने हजेरी लावली सकाळी ८.३० वाजेपर्यंत २ मिमी पावसाची नोंद झाली होती. १० जानेवारीलाही शहरात भागात ४ मिमी पाऊस झाला. मुंबई उपनगर भागात १९ फेब्रुवारीला ३ मिमी पावसाची नोंद झाली. त्यानंतर मार्च, एप्रिलमध्येही उपनगरात हलक्या सरींनी हजेरी लावली. मे महिन्यात तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबई शहर व उपनगर भागांत ठिकठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. यंदा मोसमी पाऊस सुरू होण्यापूर्वीच मुंबईत अडीचशे मिलिमीटरहून अधिक पाऊस झाला होता. त्यानंतर ९ जूनला नैर्ऋत्य मोसमी पाऊस मुंबईत प्रत्यक्ष दाखल झाला. जुलै महिन्याच्या मध्यात सलग २ दिवस पहाटेच्या वेळेस पावसाने तीव्र रूप धारण केले होते. सप्टेंबरअखेपर्यंत शहरात २३३२.३ मिमी आणि उपनगरात ३१६३.५ मिमी पावसाची नोंद झाली. ऑक्टोबरमध्ये मोसमी पाऊस परतला. मात्र, त्यानंतरही पावसाने उसंत घेतलेली नाही.
अवकाळी पावसाची कारणे
प्रामुख्याने नैर्ऋत्य मोसमी पाऊस हा जून ते सप्टेंबर या कालावधीत असतो. परंतु, युरोपीय देशांकडे निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या पट्टय़ांचा परिणाम भारतातील काही भागांवरही होतो. युरोपीय देशांमध्ये निर्माण होणारी ही वातावरणीय स्थिती ऑक्टोबर ते एप्रिल-मे या कालावधीत अधिक सक्रिय असते. या स्थितीचा परिणाम प्रामुख्याने उत्तर भारतावर होतो. काहीवेळा मध्य भारतावरही युरोपीय वाऱ्यांचा परिणाम होत असल्याने सप्टेंबरनंतर आणि जूनच्या आधीही मुंबईत तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी बरसतात. नैर्ऋत्य मोसमी पावसाच्या कालावधीत दक्षिण भारतात तुलनेने पाऊस कमी असतो. याउलट मुंबईचा पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात आग्नेय मोसमी पाऊस दक्षिण भारतात अधिक सक्रिय असतो. बंगालच्या उपसागरात निर्माण होणारे कमी दाबाचे पट्टे अरबी समुद्राकडे सरकतात. हे पट्टे आद्र्रता घेऊन येतात. त्यामुळे महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर पाऊस पडतो’, अशी माहिती इंग्लंडच्या रेडिंग विद्यापीठातील हवामान अभ्यासक अक्षय देवरस यांनी दिली. ‘सध्या दक्षिण भागात म्हणजेच श्रीलंका, तमिळनाडू, आंध्रप्रदेश, पुडूचेरी या भागांत मोठय़ा प्रमाणात पाऊस आहे. त्यामुळे मुंबईतही त्याचा परिणाम जाणवत आहे, असेही त्यांनी सांगितले.