राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आता सुरू करा, जिल्हाबंदी उठवा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. राज्यातील मंदिरे खुली करा, या साधुसंतांच्या मागणीलाही त्यांनी पाठिंबा जाहीर केला. या मागण्यांवर सरकारने लवकर निर्णय केला नाही, तर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

टाळेबंदीत राज्यात आंतरजिल्हा प्रवासावर निर्बंध घालण्यात आले आहेत. ही जिल्हाबंदी हटवावी आणि नागरिकांना एका जिल्ह्य़ातून दुसऱ्या जिल्ह्य़ात जाण्यासाठी परवानगी द्यावी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ताबडतोब तशी घोषणा करावी, असे आवाहन आंबेडकर यांनी केले.

Story img Loader