लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : उद्योगपती राज कुंद्रा बुधवारीही सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) चौकशीला अनुपस्थित राहिला. ईडीने त्याला दुसऱ्यांना समन्स पाठवून बुधवारी चौकशीला उपस्थित राहण्यास सांगितले होते. राज कुंद्राने ईडी चौकशीला उपस्थित राहण्यासाठी कालावधी मागितला होता. पण, ईडीने राज कुंद्रा यांना समन्स पुन्हा पाठवून बुधवारी चौकशीला उपस्थित राहण्यासाठी सांगितले होते. मात्र, बुधवारीही तो अनुपस्थित राहण्यामुळे आता ईडी लवकरच तिसरा समन्य पाठवण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा-बांधकामाची पाहणी कोणी केली? मालवण शिवपुतळा दुर्घटना प्रकरणी उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा

ईडीने आठवड्याभरापूर्वी १५ ठिकाणी छापे टाकले होते. त्यात राज कुंद्रा आणि अभिनेत्री गहना वशिष्ठच्या ठिकाणांचाही समावेश आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांन मे २०२२ मध्ये अश्लील चित्रपटांच्या निर्मितीप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्याच्या आधारावर ईडी तपास करत आहे. गहना वशिष्ठलाही ईडीने याप्रकरणी समन्स बजावून ९ डिसेंबरला चौकशीला उपस्थित राहण्यास सांगितले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj kundra absent from enforcement directorate inquiry again mumbai print news mrj