Raj Kundra Summoned By ED : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांच्या अनेक ठिकाणांवर अंमलबजावणी संचनालयाने नुकतेच छापे टाकले होते. यानंतर आता अंमलबजावणी संचनालयाने राज कुंद्रा यांना हाय-प्रोफाइल पॉर्नोग्राफी रॅकेट प्रकरणात चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमलबजावणी संचनालयाने उद्योगपती राज कुंद्रा यांना सोमवारी सकाळी ११ वाजता मुंबईतील कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान या प्रकरणातील इतरांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. या बाबतचे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई पोलिसांनी जुलै २०२१ मध्ये राज कुंद्रा यांना अश्लील कंटेंटची निर्मिती आणि त्याचे वितरण केल्याच्या आरोपावरून अटक केली होती. आता अंमलबजावणी संचनालय पॉर्न फिल्मच्या निर्मिती आणि विक्रीतून मिळालेल्या कमाईची चौकशी करत आहे. अंमलबजावणी संचनालयाने तपासाचा भाग म्हणून नुकतेच या प्रकरणाशी संबंधित मुंबई आणि उत्तर प्रदेशातील सुमारे १५ ठिकाणांवर छापे टाकले होते.

महिलांचा आरोप

२०२१ मध्ये अनेक महिलांनी आरोप केले होते की, त्यांना वेब सिरीज आणि चित्रपटांच्या ऑडिशनच्या नावाखाली अश्लील कंटेंटच्या चित्रिकरणास भाग पाडले गेले. यानंतर मुंबई पोलिसांनी राज कुंद्रा यांच्या विरोधात तपास सुरू केला होता.

या महिलांनी पुढे दावा केला होता की, त्यांना शूटिंग पूर्ण करण्यासाठी धमकावण्यात आले आणि दबाव आणला गेला. पुढे हा कंटेंट हॉटशॉट्स, हॉटहिट मूव्हीज सारख्या सबस्क्रिप्शन आधारित मोबाइल ॲप्स आणि Hothitmovies आणि Nuefliks सारख्या वेबसाइटवर अपलोड केला गेला.

काय आहेत मुंबई पोलिसांचे आरोप?

या प्रकरणी मुंबई पोलिसांनी आरोप केला आहे की, राज कुंद्रा यांनी ॲप आणि इतर प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अश्लील कंटेंट प्रसारित करत मोठी कमाई केली आहे.

तपासादरम्यान, पोलिसांनी मेमरी कार्ड, हार्ड डिस्क आणि हॉटशॉट्स ॲपसाठी आर्थिक अंदाज आणि मार्केट स्ट्रॅटेजीचे तपशील देणारे पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनसह दोषी पुरावे जप्त केले.

राज कुंद्रा यांनी २०१९ मध्ये आर्म्सप्राइम मीडिया नावाची कंपनी सुरू केली होती. या कंपनीनेच Hotshots अ‍ॅप सुरू केले होते. पुढे राज कुंद्रा यांनी त्यांचे नातेवाईक असलेल्या प्रदीप बक्षी यांच्या युकेतील फर्मला हे अ‍ॅप विकले.

हे ही वाचा : शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा पुन्हा अडचणीत, घर आणि ऑफिसवर ईडीची धाड

राज कुंद्रा काय म्हणाले?

अंमलबजावणी संचनालयाने नुकतेच टाकलेल्या छाप्यानंतर राज कुंद्रा यांच्याकडून एक निवेदन जारी करण्यात आले होते. त्यामध्ये म्हटले होते की, “या प्रकरणात सध्या सुरू असलेल्या चौकशीला पूर्णपणे सहकार्य करत आहे.”

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj kundra summoned by ed in porn racket case shilpa shetty aam