महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. त्यांची भाषणं व मुलाखती कायम चर्चेचा विषय असतात. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस व राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज राज ठाकरेंची मुलाखत घेतली. या मुलाखतीत अमोल कोल्हे व अमृता फडणवीस यांनी राज ठाकरेंना काही प्रश्न विचारले. त्या प्रश्नांची त्यांनी मनमोकळेपणाने उत्तरं दिली.

“तर किरीट सोमय्यांना कॉलर पकडून…”, ५०० कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणावरून संजय राऊतांचा हल्लाबोल!

‘लोकमत’च्या मुलाखतीत अमृता फडणवीस यांनी राज ठाकरेंना त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्याबद्दल प्रश्न विचारले. शर्मिला ठाकरे सक्रिय राजकारणात आल्या तर तुम्हाला चालेल का? असा प्रश्न त्यांनी राज ठाकरेंना विचारला. त्यावर राज ठाकरे म्हणाले, “मी घरचं काम करायला तयार आहे.” त्यानंतर अमृता फडणवीस यांनी दुसरा प्रश्न विचारला. शर्मिला ठाकरे राजकारणात येऊन तुमच्या पुढे निघून गेल्या, तर तुम्हाला झेपेल का? या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले, “हो, मला याची काहीच अडचण नाही. पण तुमच्या नंतर लक्षात येईल की राज ठाकरे परवडला.” त्यावर आपल्याला परवडणारे लोकच नकोय, असं अमृता फडणवीस म्हणाल्या.

“मी येतो म्हटलं की फडणवीस पळून जातात”, ५०० कोटी घोटाळ्याप्रकरणी संजय राऊतांचं मोठं विधान

दरम्यान, या मुलाखतीत बोलताना त्यांनी राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती व इतर अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. या प्रश्नाला जोडूनच सर्वसामान्य युवकांनी राजकारणात यावं का? तसेच तुमच्या पाहण्यात असा एकही नेता, त्यांचा मुलगा, पुतण्या किंवा भाचा आहे का, ज्यांच्यावर कार्यकर्त्यांपेक्षा जास्त गुन्हे दाखल असतील, असा प्रश्न अमोल कोल्हेंनी राज ठाकरेंना विचारला. त्यावर ते म्हणाले, “माझ्यावर, माझ्यावर राज्यभरात सर्वांपेक्षा जास्त केसेस असतील. तसेच तुम्ही एखाद्या व्यक्तीला राजकारणात आणू शकता, लादू शकत नाही. अमितबद्दल बोलायचं झाल्यास मी बाप म्हणून त्याला राजकारणा आणू शकतो, पण लादू शकत नाही. हे लोकांनी स्वीकारायचं असतं.”

Story img Loader