सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय खंडपीठाने अखेर बहुप्रतिक्षित महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील निकाल दिला. यानंतर त्यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया आल्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही यावर आपलं मत व्यक्त केलं. यावेळी राज ठाकरेंनी न्यायालयाच्या निकालावर भाष्य केलं. मात्र, पत्रकारांनी विचारलेल्या इतर तीन प्रश्नांवर त्यांनी उत्तर देणं टाळलं. या तिन्ही प्रश्नांवर त्यांनी एका वाक्यात मोजकी प्रतिक्रिया दिली. ते शुक्रवारी (१२ मे) ठाण्यात पत्रकारांशी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पत्रकारांनी विचारलेले तीन प्रश्न आणि राज ठाकरेंची उत्तरं

प्रश्न १ – ब्रिजभूषण यांच्याविरोधातील उपोषणावर प्रश्न

राज ठाकरे – मला त्यावर बोलायचं नाही

प्रश्न २. मनसे भाजपाशी युती करणार का?

राज ठाकरे – काय संबंध. आम्ही युती करणार असू तर आधी तुला सांगू का?

प्रश्न ३. एकनाथ शिंदेंनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला पाहिजे का?

राज ठाकरे – मला माहिती नाही.

“मला उद्धव ठाकरेंविषयीचे प्रश्न विचारू नका”

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करता आलं असतं असं निरीक्षणही नोंदवण्यात आलं. याबाबत पत्रकारांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंना प्रश्न विचारला असता त्यांनी बोलणं टाळत मोजकी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “मी आधी तेच बोललो. उद्धव ठाकरेंचे काय प्रश्न आहेत याच्याशी माझा काहीही संबंध नाही. तुम्ही सर्वोच्च न्यायालयाचं विचारलं म्हणून मी तेवढंच सांगितलं. मला उद्धव ठाकरेंविषयीचे प्रश्न विचारू नका. तो वेगळा पक्ष आहे, माझा वेगळा पक्ष आहे. त्यांचे प्रश्न मला विचारून माझा वेळ वाया घालवू नका. परंतूला काहीही अर्थ नाही.”

व्हिडीओ पाहा :

हेही वाचा : VIDEO: “मला पुन्हा मुख्यमंत्री करता आलं असतं म्हणजे…”, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर उद्धव ठाकरेंची सूचक प्रतिक्रिया

मुख्यमंत्र्यांना जपून राहा असा सल्ला दिला होता, आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर काय सांगाल? यावर राज ठाकरे म्हणाले, “कुठल्याही मुख्यमंत्र्याने जपूनच राहिलं पाहिजे. आधीचे मुख्यमंत्री जपून राहिले नाही. म्हणून आज ही सगळी परिस्थिती निर्माण झाली. आपण कोणत्याही पदावर बसलेलो असलो तरी जपून राहिलं पाहिजे. प्रत्येकाला ते समजलं पाहिजे.”

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray avoid answering three questions about supreme court judgement uddhav thackeray eknath shinde pbs