महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलगी उर्वशी ठाकरे शनिवारी मध्यरात्री झालेल्या अपघातातून थोडक्यात बचावली. महालक्ष्मी जंक्शन येथे स्कूटी घसरल्याने उर्वशी खाली पडली. या अपघातात तिचा पाय फ्रॅक्चर झाला आहे.  उर्वशी ठाकरे ही शनिवारी महालक्ष्मी येथे राहणाऱ्या आपल्या मैत्रिणीकडे अभ्यासासाठी गेली होती. मध्यरात्री बाराच्या सुमारास ती मैत्रिणीसोबत रपेट मारायला निघाली. उर्वशीची मैत्रीण स्कूटी चालवत होती. महालक्ष्मी जंक्शन परिसरात स्कूटी घसरली आणि त्यात उर्वशी खाली फेकली गेली. मागून दुसरे वाहन येत नसल्याने पुढील अनर्थ टळला. उर्वशीला माहिमच्या हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उर्वशीला कुठलीही गंभीर दुखापत झालेली नसल्याचे डॉ. संजय अग्रवाल यांनी सांगितले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन उर्वशीच्या प्रकृतीची विचारपूस केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा