आज मराठी नववर्ष दिन आणि गुढपाडवा हा सण सर्वत्र साजरा केला जात आहे. गुढीपाडव्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मुंबईच्या शिवाजी पार्कवर मेळावा होतो. या मेळाव्याला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे संबोधित करतील. ही दरवर्षीप्रमाणे जंगी सभा होण्याची शक्यता आहे. यावेळी सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, या मेळाव्याआधी राज ठाकरे यांनी आजची सकाळ कुटुंबासोबत घालवली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज यांनी त्यांच्या घराबाहेर गुढी उभारली आहे. राज यांनी सकाळी त्यांचा नातू किआन ठाकरे याला कडेवर घेऊन गुढीची पूजा केली. यावेळी त्यांचा मुलगा अमित ठाकरे आणि सून मितालीदेखील सोबत होते. या क्षणाचे फोटो मनसेच्या अनेक शिलेदारांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हा किआन ठाकरेचा पहिलाच गुढीपाडवा आहे. मनसेच्या सरचिटणीस आणि महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या कार्याध्यक्षा शालिनी ठाकरे यांनी राज ठाकरे आणि नातू किआन या दोघांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हे ही वाचा >> “आता तरी माझं ऐकाल का?” छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लिहिलं, “त्यांनी मला…”

शिवतीर्थावरील सभेकडे लक्ष

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुढी पाडव्याच्या निमित्ताने शिवतीर्थावरून तोफ धडाडणार आहे. राज ठाकरे आजच्या भाषणात काय बोलणार याकडे राज्यातल्या जनतेचं लक्ष लागलं आहे. राज ठाकरे गेल्या काही दिवसात राज्याच्या राजकारणात घडलेल्या घडामोडींवर बोलतील असं म्हटलं जात आहे. शिवसेनेतली फूट, भारतीय जनता पक्ष, उद्ध ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलण्याची शक्यता आहे.