राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे गटामध्ये पक्षाच्या चिन्हावरुन आणि दावेदारीवरुन वाद सुरु असतानाच दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक घेतला. या मेळाव्यामध्ये राज यांनी कार्यकर्त्यांना सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्याचा सल्ला दिल्याची माहिती मनसेचे सचिव संदीप देशपांडे यांनी मेळाव्यानंतर दिली. राज ठाकरेंनी महानगरपालिका निवडणुकींसाठी सर्व जागा लढण्याची तयारी ठेवा असे निर्देश दिल्याची माहिती देशपांडे यांनी दिली. प्रसारमाध्यमांशी बोलताना देशपांडे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना राज आणि बाळासाहेब यांचीही तुलना केली.

नक्की वाचा >> “आदित्य ठाकरेंनी तत्काळ अंमलबजावणी करत बदलले पक्षाचे नाव”; मनसेनं शेअर केलेला स्क्रीनशॉट चर्चेत

“सर्व महानगरपालिकेच्या सर्व जागा लढवण्याचे निर्देश राज ठाकरेंनी दिले. त्या कशा लढवायच्या यासंदर्भातील मार्गर्शन राज ठाकरेंनी केलं,” असं देशपांडे यांनी ‘टीव्ही ९ मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. यावर हा स्वबळाचा नारा होता का? असं विचारलं असता, “सगळ्या महानगरपालिकेतील सगळ्या जागा म्हणजे अर्थ तोच झाला,” असं देशपांडे म्हणाले.

नक्की वाचा >> “…तेव्हा राज ठाकरेंना शिव्या घालण्याचे आदेश ‘मातोश्री’वरुन आले”; शिंदे गटातील खासदाराचा खळबळजनक आरोप

तुमची विचारसरणी सकारात्मक असणं गरजेचं आहे. सत्ता येईलच असं त्यांनी काही सांगितलं का? असा प्रश्न पत्रकाराने विचारला असता देशपांडे यांनी असाच संदेश राज यांनी दिल्याचं म्हटलं. “राज यांनी तेच सांगितलं, ज्या पद्धतीचा एक प्रचार सुरु आहे खोटा आम्ही रडलो तर लोकांच्या डोळ्यात पाणी येईल. त्या खोट्या प्रचाराला बळी पडू नका. अशी कोणतीही सहानुभूतीची लाट नाही, असं राज ठाकरेंनी सांगितलं,” असं देशपांडे म्हणाले.

नक्की वाचा >> उद्धव विरुद्ध शिंदे वादात राज ठाकरे ट्रोल! रात्री आठनंतर ‘गुड मॉर्निंग’ अन् देशपांडे, काळे, शालिनीताईंना आवरण्याचा सल्ला

तसेच राज यांनी आपल्या पक्षाबद्दल लोकांमध्ये सकारात्मक भावना असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांना दिल्याचंही देशपांडे म्हणाले. “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेप्रती लोक पॉझिटीव्ह आहेत. आपण सत्ते येऊ असा विश्वास त्यांनी दिला,” असं देशापांडेंनी सांगितलं. त्याचप्रमाणे पुढे देशपांडे यांनी, “बाळासाहेबांचे विचार किंवा शिकवण राज यांच्या रक्तारक्तात भिनलेली आहे. बाळासाहेबांनी कधी एकतरी पद घेतलं का? तीच शिकवण राज ठाकरेंकडे आहे. सत्तेचा रिमोट कंट्रोल बाळासाहेबांनी नेहमी स्वत:कडे ठेवला. जेव्हा आम्ही सत्तेत येऊ तेव्हा रिमोट कंट्रोल राज ठाकरेंकडे असेल,” असा विश्वास देशपांडे यांनी व्यक्त केला.

Story img Loader