Raj Thackeray at Chandivali constituency Remark on Dilip Lande : मुंबई महापालिकेतील राजकारणात १३ ऑक्टोबर २०१७ रोजी मोठी उलथापालथ झाली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ७ पैकी ६ नगरसेवकांनी स्वतःचा वेगळा गट तयार करून शिवसेनेबरोबर सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या परवानगीशिवाय, त्यांना पूर्णपणे अंधारात ठेवून या नगरसेवकांनी त्यांना ‘जय महाराष्ट्र’ केला होता. मात्र, राज ठाकरे यांनी त्या बंडखोरांवर कधी भाष्य केलं नाही. अखेर सात वर्षांनी राज ठाकरे यांनी त्यांच्या मनातली खदखद व्यक्त केली. मंगळवारी (१२ नोव्हेंबर) चांदीवली येथील राज ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी राज ठाकरे यांनी लांडेविरोधातील संताप व्यक्त केला. चांदीवली विधानसभा मतदारसंघातून मनसेने महेंद्र भानुशाली यांना उमेदवारी दिली आहे. दिलीप लांडे हे शिवसेनेच्या (शिंदे) तिकीटावर येथून निवडणूक लढवत आहेत.

राज ठाकरे चांदीवलीमधील प्रचारसभेत म्हणाले, “या मतदारसंघात आपला (मनसे) महेंद्र भानुशाली उभा आहे. तुम्ही सर्वांनी त्याला भरभरून मतदान करावं. तुमच्या प्रत्येक अडीअडचणीच्या काळात तो उभा राहील. मतदारसंघाचा विकास करेल, हा माझा शब्द आहे. इथे आमच्या महेंद्रविरोधात दोन लां* उभे आहेत. मतदारसंघात किती लां* उभे आहेत?” यावर उपस्थितांनी दोन असं उत्तर दिलं. त्यानंतर राज ठाकरे म्हणाले, “त्यातला एक गद्दार आहे. त्याच्यासाठी ***खोर शब्द देखील कमी पडेल. मला प्रश्न पडतो की या लोकांना आम्ही काय कमी केलं होतं?”

Raj Thackeray Slams Uddhav Thackeray in his Speech
Raj Thackeray : राज ठाकरेंची टीका, “उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांची शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दावणीला..”
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Sharad Pawar On Dilip Walse Patil
Sharad Pawar : शरद पवारांचा दिलीप वळसे पाटलांना जाहीर इशारा; म्हणाले, ‘गद्दाराला शिक्षा द्यायची, १०० टक्के…’
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
AI lawyer responds to CJI Chandrachud's question
CJI DY Chandrachud to AI Lawyer: “भारतात फाशीची शिक्षा…”, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा AI वकिलाला प्रश्न; उत्तराने झाले सर्वच अवाक
What Poonam Mahajan Said About Pramod Mahajan ?
Poonam Mahajan : ‘प्रमोद महाजन यांना ठार करण्याचं षडयंत्र कशासाठी आखलं गेलं?’ पूनम महाजन यांचं उत्तर, “त्यांना…”
What Sharad Pawar Said About Devendra Fadnavis?
Sharad Pawar : शरद पवार म्हणाले, “पक्ष उभा करायला अक्कल लागते, फोडायला…”
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

हे ही वाचा >> “उद्धव ठाकरेंच्या हातून पैसा सुटत नाही, बॅगेत काय असणार?” राज ठाकरेंची खोचक टीका!

राज ठाकरेंकडून सात वर्षांनी मनातली खदखद व्यक्त

राज ठाकरे म्हणाले, “ते काही जण (दिलीप लांडे व बंडखोरी करणारे इतर सहा नगरसेवक) नगरसेवक झाले. त्यानंतर महापालिकेत स्थायी समितीत होते. चार वर्ष वेगवेगळ्या पदांवर बसले. त्यानंतर इतरांना संधी देण्यासाठी याला (दिल्लीप लांडे) बाजूला केल्यानंतर हा माणूस शिवसेनेकडे विकला गेला. हा कोणत्या वेळेला विकला गेला माहितीय का? माझा मुलगा रुग्णालयात होता. त्याच्यावर उपचार चालू होते. त्यावेळी हा माणूस सहा नगरसेवकांना घेऊन शिवसेनेकडे विकला गेला. मी त्यावेळी अडचणीच्या परिस्थितीतून जात होतो. त्यावेळी हा माणूस पैसे घेऊन विकला गेला. त्यानंतर त्याने (उद्धव ठाकरे) याला आमदारकी दिली. मग हा आमदार झाला. हा तिथेही (उद्धव ठाकरेंकडे) टिकला नाही. हा दुसरीकडे (एकनाथ शिंदे) विकला गेला. म्हणजे हा माणूस इथून तिकडे विकला जातो, तिथून दुसरीकडे विकला जातो, असा विकला जाणारा माणूस तुम्हाला आमदार म्हणून हवा आहे का?

हे ही वाचा >> “माझी बॅग तुझ्याकडे देतो, फक्त त्यातले कपडे…”; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं!

मनसे अध्यक्ष म्हणाले, “कोण विश्वास ठेवणार यांच्यावर? ही बांधकाम व्यवसायिकांच्या खिशातली माणसं आहेत. सर्व गोष्टी पैशांवर मोजायच्या, तोलायच्या. हा आमच्या महेंद्रविरोधात प्रचार करताना सांगतोय की आमचा भानुशाली अमराठी आहे. त्याला मला सांगायचं आहे की मराठी माणसासाठी झगडणारा अमराठी आहे तो. महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी त्याग करणारा प्रत्येक जण माझ्यासाठी मराठीच आहे.