उजवीकडून डावीकडे धाव; लेटरहेडमध्येही राज ठाकरे यांच्याकडून सुधारणा
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाल्यापासून २०१२ पर्यंत मनेसेचे इंजिन’ जोरात धावत होते. मात्र त्यानंतर मनसेच्या इंजिनाचा वेग मंदावू लागला. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत हे इंजिन थेट यार्डात जाऊन पोहोचले. गेल्या वर्षभरात तर या इंजिनाच्या अनेक डब्यांनी साथ सोडायला सुरुवात केल्यानंतर अचानक ‘साक्षात्कार’ झाला आणि इंजिनाची ‘दिशा’ जी डावीकडून उजवीकडे केली होती ती बदलून पुन्हा उजवीकडून डावीकडे ‘इंजिन’ धावू लागले. एवढेच नव्हे तर आपले लेटरहेडही राज ठाकरे यांनी बदलले असून त्यावर ‘श्री जयमहाराष्ट्र’ व ‘राजमुद्रा’ छापण्यात आली आहे.
प्रबोधनकार ठाकरे यांचे नातू असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे बुवाबाजी,ज्योतिष, गंडे-दोरे न मानणारे..किमान सार्वजनिक जीवनात तरी तसे ते जाहीरपणे सांगत असतात. अर्थात असे असले तरी ‘नऊ’ या अंकावर त्याचे प्रेम आहे. पक्षाची स्थापना केली तेव्हा चिन्हांचा विचार करताना ‘इंजिन’ चिन्हाची निवड करण्यात आली.
सुरुवातीला या इंजिनाचे तोंड हे उजवीकडून डावीकडे ठेवण्यात आले. निवडणूक आयोगाकडे नोंदविण्यात आल्यानुसारही इंजिनाचे तोंड डावीकडेच होते. २०१२ च्या महापालिका निवडणुकीत मनसेला भरघोस मतदान होऊन मोठय़ा संख्येने नगरसेवक निवडून आले. मनसे बहरत असतानाच पक्षाने निवडणूक आयोगाला विनंती करून ‘इंजिना’चे तोंड फिरवले. त्यामुळे मनसेच्या अधिकृत जाहिरातीवर इंजिनाचे तोंड डावीकडून उजवीकडे करण्यात आले. याबाबत मनसेचा एक ज्येष्ठ पदाधिकारी म्हणाला, उर्दू भाषा डावीकडून उजवीकडे अशा प्रकारे लिहिली जाते. मराठीच्या मुद्दय़ावर आपण लढत असताना आपल्या इंजिनाचे तोंडही उजवीकडून डावीकडे असणे कितपत योग्य आहे, असा मुद्दा पदाधिकाऱ्यांच्या चर्चेत उपस्थित झाला होता. मराठी भाषा ही उजवीकडून डावीकडे अशा पद्धतीने लिहिली जाते. आपण जेवणासाठीही प्रामुख्याने उजवा हातच वापरतो. अशावेळी इंजिनाचे तोंडही उजवीकडे असावे असे मत तेव्हा व्यक्त करण्यात आल्यामुळेच इंजिनाचे तोंड फिरविण्यात आले होते.
येत्या आठ नोव्हेंबर रोजी पुण्यात मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी तयार करण्यात आलेल्या जाहिरातींवर इंजिन चिन्हाचे तोंड डावीकडून उजवीकडे फिरविण्यात आले आहे.
जाणकारांचा सल्ला
गेल्या चार वर्षांत पक्षाला बसलेले धक्के लक्षात घेता काही वास्तुतज्ज्ञांनी ‘इंजिना’ची दिशा पुन्हा डावीकडून उजवीकडे फिरविण्याची विनंती राज यांना केली. राज यांनी ही विनंती मान्य केल्यामुळे इंजिनाची ‘दिशा’ पुन्हा बदलण्यात आली.