शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरेंना आपलं मुख्यमंत्री पद गमवावं लागलं होतं. या गोष्टीला आता नऊ महिन्यांच्यावर कालावधी उलटून गेला आहे. मात्र, आजही त्याची चर्चा सातत्याने होत असते. अनेक जण यासंदर्भात प्रतिक्रिया देत असतात. दरम्यान, आता राज ठाकरेंच्या आई मधुवंती ठाकरे यांनी यासंदर्भात भावना व्यक्त केल्या आहेत.
हेही वाचा – जेव्हा स्वत: बाळासाहेब राज ठाकरेंच्या शाळेत झाले होते हजर! मनसे अध्यक्षांनी सांगितला बालपणीचा प्रसंग
‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीच्या ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमात आज राज ठाकरे आणि त्यांच्या आई मधुवंती ठाकरे यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांना उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याबाबत विचारण्यात आलं असता, त्यावेळी वाईट वाटलं अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. “उद्धवने राजीनाम्या द्यावा, अशी इच्छा नव्हती. त्याला लहानाचं मोठं होताना मी बघितलं आहे. त्यामुळे त्याला राजीनामा द्यावा लागला, त्यावेळी वाईट वाटलं”, असे त्या म्हणाल्या.
हेही वाचा – जगभरातल्या खवय्यांना मराठी पदार्थांची चव कधी चाखता येणार? यासाठी काय केलं पाहिजे? राज ठाकरे म्हणतात…
पुढे बोलताना, राज ठाकरेंच्या शिवसेना सोडण्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. “राजने शिवसेना सोडली तेव्हा मला याची काहीही कल्पना नव्हती. कारण मी राजकारणाकडे जास्त लक्ष देत नाही. ज्या दिवशी राजने शिवसेना सोडली त्या दिवशी सकाळी मला यासंदर्भात माहिती मिळाली. त्यानंतर अनेकांचे फोन आले. मात्र, मला यासंदर्भात मला काहीच माहिती नाही, असं मी त्यांना सांगितलं”, असं त्या म्हणाल्या.
हेही वाचा – “…अन् आई अचानकपणे रडायला लागली”; राज ठाकरेंनी सांगितला १०वीच्या निकालाच्या दिवशीचा ‘तो’ किस्सा!
दरम्यान, राज ठाकरे यांनीही यावेळी जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी १० निकालाच्या दिवशी नेमकं काय घडलं, तेव्हाचा एक प्रसंग सांगितला. “१०वीचा निकाल लागला तेव्हा बाळासाहेबांनी माझ्या आईला मी नापास झाल्याचं सांगितला. तेव्ही ती रडायला लागली. मी त्यावेळी अंघोळ करत होतो. तेव्हा जयदेव यांनी मला आवाज दिला. मी दरवाजा उघडताच त्यांनी माझ्याकडे रागाने बघतिलं आणि तुला वरती बोलावलं आहे, असा निरोप दिला. त्यावेळी प्रचंड घाबरलो होते. मात्र, वरती गेल्यावर बाळासाहेब माझ्याशी मस्करी केली, हे लक्षात आलं”, असं राज ठाकरे म्हणाले.