मुंबई : चित्रपट निर्मिती ही आवड असल्यामुळे आपला चित्रपटांकडे किंवा मनोरंजनाकडे अधिक कल आहे, असे सांगून लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांवर तीन भागांमध्ये चित्रपट करणार असल्याची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी केली.  प्लॅनेट मराठी प्रस्तुत ‘अथांग’ वेब मालिकेची पहिली झलक राज यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आली. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

 ‘‘गांधी चित्रपटानंतर छत्रपती शिवाजी महाराजांवर मोठा चित्रपट यावा, अशी आपली इच्छा आहे. त्यामुळेच लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांवर मी तीन भागांमध्ये चित्रपट करणार असल्याची घोषणा राज यांनी केली.  महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अभिनेता अक्षय कुमार साकारणार असल्याने आता राज ठाकरे यांचा मराठी बाणा कुठे गेला, असा प्रश्न विचारणाऱ्यांना राज ठाकरेंनी काहीही झालं तरी मी कट्टर मराठी आहे, असे उत्तर दिले. आम्ही ज्या क्षेत्रात काम करतो तिथे कसलाच थांगपत्ता लागत नाही आणि आज मी थेट अथांग वेब मालिकेच्या झलक प्रसिद्धीच्या सोहळय़ासाठी आलो आहे, असे राज यांनी मिश्किलपणे म्हटले.