Raj Thackeray on Amit Thackeray Mahim Assembly Candidature : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गेल्या महिन्यात २२ ऑक्टोबर रोजी त्यांच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीद्वारे त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना दादर-माहीम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली असून अमित ठाकरे यांनी मोठं शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यापाठोपाथ त्यांनी मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू केला आहे. अमित ठाकरे हे मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. अमित ठाकरेंच्या रुपाने ठाकरे घराण्यातील दुसरी व्यक्ती (आदित्य ठाकरे यांच्यानंतर) निवडणुकीला उभी राहिली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे हे देखील अमित ठाकरेंसाठी जोरदार प्रचार करत आहेत. दरम्यान, अमित ठाकरे यांना उमेदवारी का दिली यावर राज ठाकरे यांनी भाष्य केलं आहे.

राज ठाकरे यांनी रविवारी (१० नोव्हेंबर) अमित ठाकरेंच्या प्रचारासाठी दादरमध्ये मनसेने आयोजित केलेल्या प्रचारसभेला संबोधित केलं. यावेळी ते उपस्थितांना म्हणाले, “अमितला उमेदवारी देण्याची प्रक्रिया तुम्ही पाहिली असती तर तुमच्या लक्षात आलं असतं की तो स्वतः निवडणुकीला उभा राहिला आहे. काही महिन्यांपूर्वी मनसेच्या नेत्यांची व सरचिटणीसांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत आमचे बाळा नांदगावकर उभे राहिले आणि त्यांनी सर्वांना विचारलं की विधानसभा निवडणुकीला उभे राहण्यास कोण कोण इच्छूक आहे? त्यावर चर्चा चालू असताना अमित तिथे म्हणाला, ‘प्रत्येक नेत्याने निवडणुकीला उभं राहायला हवं. उद्या पक्षाने मला आदेश दिला तर मी स्वतः देखील निवडणुकीला उभा राहीन’. त्या बैठकीनंतर याबाबत बातमी येऊन गेली. मी त्या बातमीकडे फारसं लक्ष दिलं नाही”.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हे ही वाचा >> “आम्हाला अमेरिकेची चिंता नाही”, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची भूमिका; म्हणाले, “ट्रम्प यांनी उचललेल्या पहिल्या तीन कॉलमध्ये…”!

…तेव्हा मला या बातम्यांचं गांभीर्य लक्षात आलं : राज ठाकरे

राज ठाकरे म्हणाले, “मनसे नेत्यांची आणखी एक बैठक पार पडली. त्या बैठकीत मी देखील होतो. त्या बैठकीत एक दोन जण म्हणाले, आपण अमित ठाकरे यांना भांडुप विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीला उभं करू. तेव्हा मला याचं गांभीर्य लक्षात आलं. हे काहीतरी वेगळं प्रकरण दिसतंय याची मला कल्पना आली. मग दुसऱ्याच दिवशी मी आणि माझी पत्नी शर्मिला, आम्ही दोघांनी अमितशी चर्चा केली. मी अमितला विचारलं या ज्या बातम्या माझ्या कानावर येतायत त्या खऱ्या आहेत का? तुला निवडणुकीला उभं राहायचं आहे का? त्यावर अमित म्हणाला, तू म्हणालास तर मी निवडणुकीला उभा राहीन. मात्र, माझी निवडणुकीला उभं राहण्याची इच्छा आहे”.

हे ही वाचा >> चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी

राज ठाकरे काय म्हणाले?

मनसे अध्यक्ष म्हणाले, “अमितने मला स्पष्ट सांगितलं की तू म्हणालास तर मी निवडणूक लढवेन, तू नको म्हणालास तर मी उभा राहणार नाही. त्यानंतर मनसेच्या आणखी दोन बैठका झाल्या. मग माझ्याही लक्षात आलं की अमितची स्वतःची निवडणूक लढवण्याची इच्छा आहे आणि मीही त्याला विरोध केला नाही. माझ्या वडिलांनी किंवा बाळासाहेब ठाकरे यांनी आमच्यावर कधीच कुठली गोष्ट लादली नाही. एखादी गोष्ट करा किंवा करू नका, असं कधी आम्हाला सांगितलं नाही. मी देखील माझ्या मुलांना या गोष्टी सांगत नाही. त्यामुळे मला वाटलं, अमितची निवडणुकीला उभं राहण्याची इच्छा आहे तर त्याने निवडणूक लढवावी. मला स्वतःला मात्र कधी निवडणूक लढवाविशी वाटली नाही.

Story img Loader