आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महत्वपूर्ण बैठक मनेसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत राज ठाकरे यांनी नेते, पदाधिकरी आणि कार्यकर्तयांना महापालिका निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश दिले. तसेच, मनसैनिकांनी युतीच्या चर्चेत पडू नये, असं आवाहन देखी राज ठाकरे यांनी या बैठकीत केल्याचं समोर आलं आहे.

ही बैठक संपल्यानंतर मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले की, “निवडणुकीचं, सोशल मीडियाचं, निवडणुकीच्या दिवशीचं व्यवस्थापन कसं करायचं? या संदर्भातील समित्या स्थापन करून, तसेच काही लोकाशी बोलून आणि तिथल्या इच्छुक उमेदवारांशी बोलून त्यांचे मुद्दे काढणे. उमेदवारांची यादी ठरवणे. या सगळ्यांबाबतची चर्चा आजच्या बैठकीत झाली. आता सध्या तरी राज ठाकरे यांनी आम्हाला स्वतंत्र लढण्याच्या दृष्टीने तयारी करण्याचे आदेश दिलेले आहेत.”

uddhav Thackeray Devendra fadnavis
“पुढील मकर संक्रांतीपर्यंत ठाकरे-फडणवीस एकत्र”, आमदार रवी राणांचा दावा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Chandrakant Khaire
Chandrakant Khaire : “हात जोडून विनंती करतो, उद्धव ठाकरेंची साथ सोडू नका”, चंद्रकांत खैरेंचं व्यासपीठावर कार्यकर्त्यांना दंडवत
Image Of MVA
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ठाकरे गटाच्या स्वबळाच्या भूमिकेमागे नेमकी कारणं काय?
Supriya Sule
Supriya Sule : महापालिका निवडणुकीबाबतच्या ठाकरे गटाच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंचं रोखठोक मत; म्हणाल्या, “या निवडणुका…”
Vijay Wadettiwar On Thackeray group
Vijay Wadettiwar : “आम्ही उद्धव ठाकरेंना विनंती करू, अन्यथा…”, ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेवर विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान
Amit Deshmukh On BMC Election 2025
Amit Deshmukh : ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेनंतर काँग्रेसची भूमिका काय? अमित देशमुखांचं मोठं भाष्य; म्हणाले, “आम्ही देखील…”
Sanjay Raut On Mumbai Municipal elections 2025
Sanjay Raut : महाविकास आघाडीत फूट? “काय होईल ते होईल, आम्ही सर्व महापालिका स्वबळावर लढवणार”, ठाकरे गटाची मोठी घोषणा

तसेच, “ वॉर्ड रचना बदलली तरी लोकाची नाराजी नाही ना बदलू शकत. मरठी माणसं, हिंदुत्ववादी माणसं शिवेसेनेबरोबर आहेत का? मग शिवसेनेला अनुकुल असे कुठले वॉर्ड? मुळात असं काही नसतं, लोकाची मानसिकता आता शिवसेनेबरोबर नाही. या संपूर्ण करोनाच्या कालावधीत ज्या प्रकारचा त्रास लोकाना झालेला आहे. किती वॉर्ड रचना बदलली तरी आजचं मरण उद्यावर ढकलू शकतील पण मरण अटळ आहे हे निश्चत. असंही संदीप देशपांडे यांनी यावेळी शिवसेनेवर टीका करताना बोलून दाखवलं. ”

याचबरोबर, “ सध्या सगळ्या जागांवर उमेदवारांची चाचपणी करण्याचे आदेश राज ठाकरे यांनी दिली आहेत. तसेच, मुंबईचं महत्व कितीही कमी करण्याचा प्रयत्न कोणीही केला, गेल्या दीडशे वर्षात हे कोणालाही जमलेलं नाही आणि यापुढेही जमणार नाही. ” असंही यावेळी संदीप देशपांडे यांनी माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितलं.

Story img Loader