आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेने पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हेदेखील पक्षविस्तारासाठी मैदानात उतरले आहेत. आज त्यांनी मुंबईतील गटप्रमुखांना संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी मनसेने हाती घेतलेल्या आंदोलनांवर भाष्य केले. मनसेने हाती घेतलेली आंदोलनं विस्मरणात जाण्यासाठी काय करता येईल त्यासाठी एक यंत्रणा राबवली जाते. याच कारणामुळे आम्ही मनसेने राबवलेल्या आंदोलनांची एक पुस्तिका काढणार आहे, अशी घोषणा राज ठाकरे यांनी केली. ही पुस्तिका लवकरच मनसेच्या सर्व कार्यकर्त्यांना देण्यात येईल, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
हेही वाचा >> मोठी बातमी! मनसेचे नेते वसंत मोरे पुन्हा एकदा नाराज?
“मनसेतर्फे होणारी आंदोलने विस्मरणात कशी जातील, यासाठी काही यंत्रणा काम करत आहेत. जेव्हा मनसेने टोलनाक्याचे आदोलंन केले तेव्हा अनेकांना अटक झाली. मात्र या आंदोलनानंतर ६५ ते ६७ टोलनाके बंद झाले. ज्यांनी टोलनाके बंद करण्याचे आश्वासन दिले होते, त्यांना काहीही विचारले जात नाही. आम्ही आंदोलन यशस्वी केले, मात्र तदीदेखील आम्हाला प्रश्न विचारला जातोय,” अशी खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली.
हेही वाचा >> सुषमा अंधारे यांचे मोठे विधान! शिंदे गटात अनेकजण नाराज असल्याचे म्हणत थेट नेत्यांची घेतली नावे, म्हणाल्या “लवकरच…”
“आपण एक पुस्तिका काढणार आहोत. ही पुस्तिका प्रत्येक मनसे कार्यकर्त्यापर्यंत पोहोचणार आहे. या पुस्तिकेमध्ये गेल्या १६ वर्षांत मनसेने कोणती आंदोलनं केली, मनसेने ती कशी यशस्वी केली, याबाबत माहिती असेल. आपण रेल्वेचं आंदोलन केलं. या रेल्वेच्या आंदोलनाला वेगळी दिशा दिली गेली. ते आंदोलन उत्तर प्रदेश आणि बिहार राज्याविरोधात करण्यात आले, असा रंग देण्यात आला. मात्र या राज्यातून जे लोक आले होते त्यांच्याविरोधातील हे आंदोलन होते,” अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली.
हेही वाचा >> राज्यपालांना हटवण्याच्या मागणीवरून राऊतांची सरकारवर टीका,’ सुधीर मुनगंटीवार म्हणाले “अल्टिमेटम देण्याचा…”
“गुजरातमध्ये काँग्रेसच्या एका आमदाराने एक आंदोलन केले होते. एका मुलीवर बलात्कार झाल्यामुळे त्याने हे आंदोलन केले होते. या आंदोलनात उत्तर प्रदेश आणि बिहारच्या लोकांना मारण्यात आले. त्यानंतर उत्तर प्रदेश आणि बिहारच्या २० हजार लोकांना गुजरातमधून हाकलून देण्यात आले. २०१९ साली त्याच आमदाराला भाजपाने उमेदवारी दिली. माझ्या महाराष्ट्रातील तरूणांसाठी, नोकऱ्यांसाठी आम्ही रेल्वेचे आंदोलन केले होते. ते आंदोलन देश फोडण्यासाठी नव्हते,” असेही राज ठाकरे यांनी सांगितले.