लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरणात तापू लागले आहे. शेतकरी कामगार पक्षाचे(शेकाप) नेते जयंत पाटील, कोल्हापूरमधील जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे आणि नाशिकचे शिक्षक आमदार अपूर्व हिरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या ‘कृष्णकुंज’ निवासस्थानी भेट घेतली. त्यामुळे आगमी निवडणुकीत महाराष्ट्राच्या रणांगणात तिसरी आघाडी उभी राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
येत्या ९ मार्च रोजी मनसेचा वर्धापन दिन आहे. त्यादिवशी राज ठाकरे मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. यापूर्वी भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. त्यानंतर युतीमध्ये नाराजीचे वादळ उठले. या भेटीनंतर राज ठाकरेंची गुरुवारी जयंत पाटील, विनय कोरे आणि अपूर्व हिरे यांच्याशी झालेली चर्चा म्हणजे  महायुतीच्या हाकेला बगल देऊन राज्यात तिसरी आघाडी उभी करण्याची तयारी मनसे करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.  
गडकरींच्या आधी मुंडेंचीही ‘राज भेट’!