राज ठाकरे यांनी आपला महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष शिवसेनेमध्ये विलीन करावा, असा सल्ला रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख रामदास आठवले यांनी शुक्रवारी दिला. राज यांनी तसे केल्यास आम्ही त्याचे स्वागतच करू, असेही आठवले यांनी म्हटले आहे.
राज्यातील कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा काही पर्याय असू शकत नाही. मात्र, शिवसेना, भाजप आणि रिपब्लिकन पक्षाची महायुती हा निश्चितच सत्ताधाऱयांसाठी सशक्त पर्याय आहे, असे मत आठवले यांनी मांडले आहे.
राज आणि मी एकत्र येणार का, हे दोघांनाही समोरासमोर बसवून विचारा, असे वक्तव्य शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी बुधवारी केले होते. त्या पार्श्वभूमीवर महायुतीतील घटक पक्ष असलेल्या आठवले यांना त्यांची प्रतिक्रिया विचारल्यावर त्यांनी वरील सल्ला मांडले

Story img Loader