Raj Thackeray Speech : मुंबईत आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडत पडला. या मेळाव्यात राज ठाकरे यांनी राज्यभरातील मनसे पदाधिकारी व कार्यकर्तांना संबोधित केले. यावेळी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह शिंदे-फडणवीस सरकारवरही जोरदार टीका केली. दरम्यान, यावेळी त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना सोशल मीडियाचा वापर जपून करावा, असा सल्ला दिला. तसेच सोशल मीडियावर पक्षाची उणीधुणी काढल्यास पक्षातून हकालपट्टी करण्यात येईल असा इशाराही दिला.

हेही वाचा – अभिमन्यू पवारांनंतर अधिकाऱ्यांवर भडकले अजित पवार; म्हणाले, ”सातवा वेतन आयोग घेता अन्…”

नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?

”इतर राजकीय पक्षांमध्ये जो धुडगूस सुरू आहे, तो आपल्या पक्षात होता कामा नये, मी ते चालू देणार नाही. मी आपल्या पक्षात असा प्रकार सहन करणार नाही. पक्षातल्या अंतर्गत विषयांवर कोणीही एकमेकांविषयी फेसबूक किंवा इतर सोशल मीडियावर बोललं तर त्याला एक क्षणभरही मी पक्षात ठेवणार नाही. झालं तेवढं खूप झालं. आतापर्यंत तुमचे खूप चोचले पूरवले, पण यापुढे नाही”, अशा इशारा राज ठाकरे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला.

हेही वाचा – राज ठाकरेंनी केलं नुपूर शर्मांचं समर्थन; झाकीर नाईकचा उल्लेख करत म्हणाले, “झाकीर नाईकच्या एका मुलाखतीत…”

पुढे ते म्हणाले, ”तुम्ही केलेली कामं जनसेपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करा. मात्र, पक्षाची उणीधुणी काढण्यासाठी त्याचा वापर करायचा नाही. जर कोणाला काही म्हणायचे असेल तर त्यांनी तो विषय माझ्यापर्यंत किंवा इतर पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचावावा”, असे आवाहनही त्यांनी केले.

हेही वाचा – “..तर तुम्ही मुख्यमंत्रीपदाची मागणी करूच कशी शकता?” राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल; २०१९च्या सत्तानाट्यावरून टीकास्त्र!

दरम्यान, यावेळी त्यांनी राज्यातल्या सत्तापालटावरून टीका केली. यावेळी बोलताना राज ठाकरेंनी शिवसेना आणि भाजपामध्ये २०१९ साली झालेल्या फारकतीवर तोंडसुख घेतलं. “२०१९ला निवडणुका झाल्यानंतर शिवसेना-भाजपानं फारकत घेतली. का? तर म्हणे अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाबाबत ठरलं होतं. मला अजूनही आठवतंय. मला माहिती आहे. कारण बाळासाहेब असताना झालेल्या त्या बैठकांमध्ये मी होतो. बाळासाहेब ठाकरे, मनोहर जोशी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे असे बरेच जण होते. तिथे पहिल्यांदा ती गोष्ट ठरली की ज्याचे जास्त आमदार, त्याचा मुख्यमंत्री. जर ही गोष्ट तुमच्यात ठरली आहे, तर २०१९ला तुम्ही मुख्यमंत्रीपदाची मागणी करूच कशी शकता?”, असा सवाल राज ठाकरेंनी केला.

Story img Loader