ज्या माणसाने स्वत:चे संपूर्ण जीवन शिवआख्यान आणि शिवचरित्र लिहण्यात घालवले, त्या बाबासाहेब पुरंदरेंना आज महाराष्ट्रात पोलीस संरक्षण घेऊन फिरावं लागतंय, ही खूप दुर्दैवाची गोष्ट असल्याची खंत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केली. ते रविवारी मुंबईत बाबासाहेब पुरंदरे यांच्या ९५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी राज ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदरेंवर टीका करणाऱ्यांचा समाचार घेतला. यावेळी राज ठाकरेंनी महाराष्ट्रभूषण सन्मानावरुन झालेल्या वादावरही भाष्य केले. काही जणांकडून बाबासाहेबांचा उल्लेख श्रीमंत म्हणून केला जातो. पण राजकारणामध्ये येऊन श्रीमंत झालेल्या व्यक्ती बाबासाहेबांवर बोटं उगारत आहेत. पण बाबासाहेबांनी मांडलेल्या इतिहासातील आक्षेपांवर चर्चा करायला कुणीही पुढे येत नाही. कारण त्यांना जातीपातीची लेबलं लावून फक्त आरोप करायचे आहेत. मराठ्यांचा इतिहास ब्राह्मणांनी लिहला किंवा ब्राह्मणांचा इतिहास मराठ्यांनी लिहला तर तो चुकीचा, असा प्रकार आपल्याकडे घडत आहे, असे राज यांनी म्हटले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा