मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या आई मधुवंती ठाकरे यांची नुकताच एबीपी माझा या वृत्तवाहिनीने मुलाखत घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी कुटुंबातील अनेक किस्से सांगितले. तसेच राज ठाकरे यांच्या आईंनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. दरम्यान, यावेळी राज ठाकरे यांनी १०वीचा निकाल लागला त्या दिवशीचा एक प्रसंग सांगितला.
हेही वाचा – जगभरातल्या खवय्यांना मराठी पदार्थांची चव कधी चाखता येणार? यासाठी काय केलं पाहिजे? राज ठाकरे म्हणतात…
काय म्हणाले राज ठाकरे?
“१०वीचा निकाल लागला तेव्हा बाळासाहेबांनी माझ्या आईला मी नापास झाल्याचं सांगितला. तेव्ही ती रडायला लागली. मी त्यावेळी अंघोळ करत होतो. तेव्हा जयदेव यांनी मला आवाज दिला. मी दरवाजा उघडताच त्यांनी माझ्याकडे रागाने बघतिलं आणि तुला वरती बोलावलं आहे, असा निरोप दिला. त्यावेळी प्रचंड घाबरलो होते. मात्र, वरती गेल्यावर बाळासाहेब माझ्याशी मस्करी करत होते, हे लक्षात आलं”, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.
पुढे बोलाताना ते म्हणाले, “मी १०वी पास झालो म्हणून बाळासाहेबांनी घरात कलर टीव्ही आणला होता. मी जर त्यावेळी बोर्डात पहिला आलो असतो, तर बाळासाहेबांनी काय केलं असतं याचा विचार न केलेलाच बरा”,
हेही वाचा – “आपण लवकरच सत्तेत असू आणि १०० टक्के…” ‘राज’पुत्र अमित ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास
दरम्यान, यावेळी बोलताना राज ठाकरे यांच्या आईंनीही जुन्या आठणींना उजाळा दिला. “राज शाळेत असताना शुक्रवारी बाळासाहेब त्याला घ्यायला गाडी पाठवत होते. शनिवार आणि रविवार राज ‘मातोश्री’वरच असायचा. शनिवारची शाळा तर त्याने कधी बघितलीच नाही. तेव्हा शनिवारी सकाळची शाळा असायची, बाळासाहेब म्हणायचे एवढ्या सकाळी कोणी शाळेत जातं का? मुळात तो लहान असताना बाळासाहेबांनी त्याचे अतोनात लाड केले”, असं त्यांनी सांगितला.