आज मुंबईतील शिवाजी पार्कवर महायुतीची प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. या प्रचारसभेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदी यांचं जाहीर कौतुक केलं. तसेच त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे काही मागण्यादेखील केल्या. विशेष म्हणजे यावेळी भाषणाची सुरुवात करताना राज ठाकरे यांनी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा उल्लेख केला. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं काय घडलं?

राज ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात करताना पंतप्रधान मोदी यांचं मुंबईत स्वागत केलं. यावेळी पंतप्रधान मोदी यांचा उल्लेख करताना पंडित जवाहरलाल नेहरुं यांच्यानंतर हिंदुस्थानचे तिसऱ्यांना पंतप्रधान बनणारे नरेंद मोदी असा केला आणि त्यानंतर भाषणाला सुरुवात केली. राज ठाकरे यांनी अगदी सुरुवातीलाच नेहरु यांचे नाव घेतल्याने अनेकांना आश्चर्य वाटलं.

हेही वाचा – भाजपा संविधान बदलणार? विरोधकांच्या आरोपांनतर राज ठाकरेंची पंतप्रधान मोदींसमोर मोठी मागणी

राज ठाकरेंचं पंतप्रधान मोदींकडून जाहीर कौतुक

यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांचे जाहीर कौतुकही केलं. “पंतप्रधान मोदी यांच्यामुळेच आज अयोध्येत राममंदिर उभं राहिलं आहे, काश्मीरला विशेष दर्जा देणारा ३७० कलम रद्द झालं आहे आणि तिहेरी तलाक कायदा रद्द झाला आहे. गेल्या पाच वर्षात त्यांनी हे तीन धाडसी निर्णय घेतले. त्यामुळे त्यांचे अभिनंदन करायला हवं”, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली.

देशविघातक कारवाया करणाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी

पुढे बोलताना त्यांनी देशविघातक कारवाया करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही केली. “आज देशात अनेक चांगले-देशभक्त मुसलमान आहेत, जे देशाच्या प्रगतीत सहभागी होऊ इच्छितात त्यांना आश्वस्त करा, पण मोहल्ल्यांमध्ये राहणारे, औवेसीसारख्यांच्या मागे फिरणारा जो मुसलमान आहे, त्यांच्या मोहल्ल्यांमध्ये आपले पोलीस घुसवून तिथे ज्या देशविघातक कारवाया सुरु आहेत त्यावर कायमचा चाप बसवा”, असे ते म्हणाले.

हेही वाचा – महायुतीच्या व्यासपीठावरून राज ठाकरेंच्या पंतप्रधान मोदींकडे पाच मागण्या; म्हणाले “सर्वात आधी…”

“संविधान बदलणार नाही, देशाला आश्वस्त करा”

“पंतप्रधान मोदी हे तिसऱ्यांदा सत्तेत आल्यास संविधान बदलणार अशी आवई विरोधकांनी उठवली आहे, त्यांना तुम्ही उत्तर दिलंच आहे. तुम्ही संविधान बदलणार नाही हे मला माहीत आहेच पण तुमच्याकडून पुन्हा एकदा देशाला आश्वस्त करा की भारतीय संविधानाला धक्का लागणार नाही”, आवाहनही त्यांनी केलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray took name of pandit jawaharlal nehru in front of pm narendra modi in shivaji park rally spb