महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आता या विषयावरुन राज्यातील राजकारण चांगलच तापताना दिसत आहे. शिवाय, मशिदींवरल भोंगे जर काढले नाहीत तर मशिदींसमोर सामूहिक हनुमान चालीसा पठण केले जाईल, असा इशाराही दिला गेला आहे. या पार्श्वभूमीवरच आज हनुमान जयंतीनिमित्त राज ठाकरे यांनी एक ट्वीट करून विशेष शुभेच्छा दिल्या आहेत.

“देशभरातील तमाम हिंदू बांधवांना हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!” अशा शब्दांमध्ये देशभरातील हिंदू बांधवांना राज ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

राज ठाकरे झाले हिंदुजननायक; पुणे दौऱ्याआधीच पोस्टरवरील उल्लेखाची चर्चा अधिक; हनुमान जयंतीला तापणार वातावरण

राज ठाकरे हे हिंदुत्वाच्या मुद्य्यावर आक्रमकपणे जाहीर भूमिका मांडताना दिसत आहेत. शिवाय, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी राज्य सरकारला ३ मे पर्यंत अल्टिमेटम दिला आहे. त्यातच आज राज ठाकरेंच्या हस्ते हनुमान जयंती निमित्त पुण्यात महाआरती होणार आहे. ही महाआरती म्हणजे राज ठाकरेंच्या भोंग्याविरोधातील आंदोलनाची सुरुवात असल्याचं बोललं जात आहे.

पुण्यातील खालकर चौक मारुती मंदिरात राज ठाकरेंच्या हस्ते महाआरती होणार असून सामूहिक हनुमान चालिसा पठण केलं जाणार आहे. संध्याकाळी ६ वाजता ही महाआरती होणार आहे. महत्वाचं म्हणजे या पोस्टरवर राज ठाकरेंचा उल्लेख हिंदुजननायक राजसाहेब ठाकरे असा करण्यात आल्याने अधिकच चर्चा रंगलेली आहे.

Story img Loader