मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा व्यंगचित्र काढून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. आलोक वर्मा प्रकरणावरून आणि अघोषित आणीबाणीवरून त्यांनी मोदींवर टीका केली आहे. हे व्यंगचित्रही भाजपाच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना झोंबेल असेच आहे. राज ठाकरे यांनी हे व्यंगचित्र त्यांच्या अधिकृत ट्विटर आणि फेसबुक पेजवरही पोस्ट केलं आहे. निवड समितीने दोन दिवसांपूर्वीच सीबीआय संचालक पदावरून आलोक वर्मा यांची उचलबांगडी केली. मात्र ज्या विभागात त्यांची बदली केली होती तो विभाग न स्वीकारता आलोक वर्मा यांनी राजीनामा दिला. त्याच विषयावरून राज ठाकरेंनी हे व्यंगचित्र काढले आहे.

या व्यंगचित्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक खड्डा खणताना दिसत आहेत. त्या खड्ड्याला संशय असे नाव देण्यात आले आहे. हुद्दा गमावला आणि खड्डा कमावला असा मथळा देऊन हे प्रकरण दाखवण्यात आले आहे. खड्ड्याबाहेर आलोक वर्मा प्रकरण हे एखाद्या मृतदेहासारखे ठेवण्यात आल्याचे दाखवण्यात आले आहे. वर्मा प्रकरण गाडून टाकतोय असे मोदी म्हणत आहेत आणि सुजाण नागरिक विचारत आहेत की ते सगळं ठीक आहे पण तुम्ही खड्ड्यात कसे काय? वर्मा प्रकरणात मोदी कसे स्वतःच अडकले हे या व्यंगचित्रातून राज ठाकरेंनी दाखवून दिले आहे.

 

व्यंगचित्राच्या दुसऱ्या भागात नयनतारा सहगल प्रकरणावरूनही  राज ठाकरेंन सरकारवरच निशाणा साधला आहे. एक गायिका तंबोरा घेऊन गायन करण्यास बसल्या आहेत पेटीवाला त्यांना म्हणतो आहे की पोलीस विचारत आहेत आज कोणता राग गाणार आहात? तर दुसरीकडे एक पोलीस दाखवण्यात आला आहे. जो तक्रार नोंदवून घेतो आहे. तर त्याच व्यंगचित्रात नयनतारा सहगल यांना मराठी साहित्य संमेलनाचे पाठवलेले निमंत्रण सरकारच्या दबावामुळे मागे घेण्यात आले अशी बातमी दाखवण्यात आली आहे. खरेतर नयनतारा सहगल यांना मनसेनेच विरोध दर्शवला होता. विरोध दर्शवून तो मागेही घेण्यात आला. मात्र या प्रकरणाचे खापरही राज ठाकरेंनी त्यांच्या व्यंगचित्रातून सरकारवरच फोडले आहे.

 

Story img Loader