गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उद्या होणाऱ्या शपथविधी समारंभाला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत. या शपथविधी कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी राज ठाकरे यांना निमंत्रित करण्यात आल्यामुळे पत्नी शर्मिला व मुलगा अमित यांच्यासह राज उद्या सकाळी गुजरातला रवाना होत आहेत.
अहमदाबाद येथील सरदार पटेल स्टेडियममध्ये नरेंद्र मोदी हे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. या समारंभाला शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. राज यांनी यापूर्वीही अनेकदा मोदी यांच्या कामाचे तसेच गुजरातच्या विकासाचे कौतुक केले आहे. गेल्या वर्षी गुजरातच्या प्रगतीची पाहणी करण्यासाठी मोदी यांच्या निमंत्रणावरून त्यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत गुजरातचा दौराही केला होता.
आणखी वाचा