मुंबई: पूर्व उपनगरांतील कुर्ल्यापासून पुढे ठाणे व नवी मुंबईमधील रुग्णांना अद्ययावत आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यासाठी राजावाडी रुग्णालयाचे रुपांतर सुररस्पेशालिटी रुग्णालयात करण्यात येणार आहे. त्यासाठी या रुग्णालयाची क्षमता वाढविण्यात येणार असून तातडीने रुग्णालयाचे विस्तारीकरण पूर्ण करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी स्पष्ट केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी सकाळी १०.३० वाजता राजावाडी रुग्णालयाला भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

राजावाडी रुग्णालयात सध्या दररोज २५०० रुग्ण बाह्यरुग्ण विभागात येतात. तर १२५ रुग्ण हे आंतररुग्ण विभागात दाखल होत असून, रुग्णालयातील रुग्णशय्या क्षमता ५९६ खाटा इतकी आहे. रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्ण येत असल्याने त्यांना अधिक चांगल्या व अद्ययावत सुविधा देण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी रुग्णालयाचे विस्तारीकरण करून सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येणार आहे. रुग्णालयात सध्या दिली जात असलेली आरोग्य सुविधा बाधित न करता राजावाडी रुग्णालयाच्या विस्तारीकरणाचे काम वेगाने करावे, अशा सूचना एकनाथ शिंदे यांनी रुग्णालय प्रशासना व महानगरपालिका अधिकाऱ्यांना दिल्या. राजावाडी सुपरस्पेशालिटी रुग्णालयामध्ये महागडे उपचार रुग्णांना मोफत मिळणार असून त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळेल. राजावाडी रुग्णालयाचे विस्तारीकरण टप्याटप्प्याने दोन वर्षांत पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा… पैशांसाठी पतीचे किळसवाणे कृत्य; स्वतःच्या पत्नीला दिले मित्रांच्या तावडीत, सांगलीच्या महिलेवर मुंबईत बलात्कार

रुग्णालयातील रुग्णकक्ष व आसपासच्या परिसराची तातडीने डागडुजी करावी. रुग्णालयाचा परिसर स्वच्छ असल्यास त्याचा चांगला परिणाम रुग्णांवर होतो. परंतु परिसर वाईट अस्वच्छ असल्यास रुग्ण अधिक गंभीर होण्याची शक्यता असते. त्यामुळे रुग्णांना अद्ययावत सोयी-सुविधा देण्याबरोबरच रुग्णालयातील स्वच्छतेवर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचनाही त्यांनी रुग्णालय प्रशासनाला दिल्या. यावेळी मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे आदी उपस्थित होते. या स्वच्छता मोहिमेमध्ये रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसह शाळेतील मुलेही सहभागी झाली होती.

कसे असेल सुपरस्पेशालिटी रुग्णालय

राजावाडी रुग्णालयामध्ये सध्या ५९६ खाटा असून, नव्याने उभारण्यात येणाऱ्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयात ४२४ खाटा असणार आहेत. त्यामुळे राजावाडी रुग्णालयातील खाटांची क्षमता १०२० इतकी होणार आहे. या रुग्णालयामध्ये अत्यावश्यक वैद्यकीय सेवा, कॅथलॅब, अतिदक्षता विभाग, ऑन्कोलॉजी, कार्डिओलॉजी, नेफ्रोलॉजी, न्यूरोलॉजी, गॅस्ट्रोऑडोंटोलाॅजी आणि पाच मॉड्युलर शस्त्रक्रिया विभाग असणार आहेत.

दोन महिन्यांत सुरू होणार अत्यावश्यक सेवा

राजावाडी रुग्णालयाच्या विस्तारीकरणाचे कामे वेगाने सुरू असून, पुढील दोन महिन्यांमध्ये अत्यावश्यक वैद्यकीय सेवा विभागाचे काम सुरू होणार आहे. तर उर्वरित कामे टप्प्याटप्याने पुढील दोन वर्षांमध्ये पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती राजावाडी रुग्णालयाच्या प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ. भारती राजुलवाला यांनी दिली.