उन्हाळ्याच्या सुट्टीत पश्चिम रेल्वे मुंबई सेंट्रल ते हजरत निजामुद्दिन या दरम्यान एक विशेष वातानुकूलित सुपरफास्ट गाडी सोडणार आहे. तर राजधानी एक्स्प्रेस आता जाता-येताना बोरिवली स्थानकावरही थांबणार आहे.
सुपरफास्ट गाडी आठवडय़ातून एकदा दर शुक्रवारी मुंबई सेंट्रलहून मध्यरात्री १२.०५ वाजता सुटेल. ही गाडी त्याच दिवशी हजरत निजामुद्दिन येथे रात्री २३.५० वाजता पोहोचणार आहे. ही गाडी ७ ते २८ मार्च या दरम्यान धावेल.
मुंबई सेंट्रल-नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस ही गाडी आता १५ मार्चपासून प्रवाशांच्या सोयीसाठी बोरिवली स्थानकावरही थांबवण्यात येणार आहे. संध्याकाळी मुंबई सेंट्रल येथून सुटणारी १२९५१ राजधानी गाडी १७.१९ वाजता बोरिवलीला पोहोचेल.
ही गाडी दोन मिनिटे बोरिवलीला थांबणार असून १७.२१ रोजी सुटेल. तर परतीच्या वाटेवरची गाडी बोरिवलीला सकाळी ७.५१ वाजता येईल आणि ७.५३ वाजता रवाना होणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा