हिंदी चित्रपटसृष्टीचा पहिला सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या पहिल्या पुण्यतिथीचे औचित्य साधून वांद्रे येथील बँडस्टँडवर त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. याआधी बँडस्टँडवर राज कपूर, देव आनंद आणि यश चोप्रा यांचे पुतळे उभारण्यात आले आहेत. गेल्या वर्षी १८ जुलैला राजेश खन्ना यांचे निधन झाले होते. चित्रपटसृष्टीतील दिग्गज म्हणून ज्यांची ओळख आहे त्यांची आठवण म्हणून यूटीव्ही स्टार्सने बँडस्टँड येथे ‘वॉक ऑफ द स्टार्स’ची निर्मिती केली असून येथे राज कपूर, देव आनंद आणि यश चोप्रा यांचे पूर्णाकृती पुतळे बसविण्यात आले आहेत. खास स्मितहास्य असलेला खन्ना यांचा चेहरा कोरण्यात आला आहे.
बँडस्टँडवर राजेश खन्नाचा पुतळा
हिंदी चित्रपटसृष्टीचा पहिला सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या पहिल्या पुण्यतिथीचे औचित्य साधून वांद्रे येथील बँडस्टँडवर त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. याआधी बँडस्टँडवर राज कपूर, देव आनंद आणि यश चोप्रा यांचे पुतळे उभारण्यात आले आहेत.
First published on: 18-07-2013 at 03:07 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajesh khannas statue to be unveiled at bandra bandstand