हिंदी चित्रपटसृष्टीचा पहिला सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या पहिल्या पुण्यतिथीचे औचित्य साधून वांद्रे येथील बँडस्टँडवर त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. याआधी बँडस्टँडवर राज कपूर, देव आनंद आणि यश चोप्रा यांचे पुतळे उभारण्यात आले आहेत. गेल्या वर्षी १८ जुलैला राजेश खन्ना यांचे निधन झाले होते. चित्रपटसृष्टीतील दिग्गज म्हणून ज्यांची ओळख आहे त्यांची आठवण म्हणून यूटीव्ही स्टार्सने बँडस्टँड येथे ‘वॉक ऑफ द स्टार्स’ची निर्मिती केली असून येथे राज कपूर, देव आनंद आणि यश चोप्रा यांचे पूर्णाकृती पुतळे बसविण्यात आले आहेत.  खास स्मितहास्य असलेला खन्ना यांचा चेहरा कोरण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा