राज्य शासनाने मोठा गाजावाजा करून ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य विमा योजना’ सुरू केली असली तरी त्याचे कार्डवाटप गेले पाच महिने रखडले आहे. हजारो कार्डे शिधावाटप कार्यालयांमध्ये पडून असून लाभार्थीपर्यंत ती पोचलेली नाहीत. याबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.
ही कार्डे तयार होऊन पाच महिने उलटले असले तरी ती धूळ खात पडली आहेत. हे काम अन्न व नागरी पुरवठा विभागावर ढकलण्यात आले आहे. या विभागाने अंगणवाडी सेविकेला प्रतिकार्ड तीन रुपये हा दर देऊन वाटपाचे काम सोपविले आहे. पण त्यांचे वितरण झाले नसून हजारो कार्डे शिल्लक आहेत आणि ती शिधावाटप कार्यालयांमध्ये पडून आहेत.
आरोग्य विभागाने ती आपल्या ताब्यात घेऊन पालिकेच्या मदतीने प्रत्येक प्रभागातील आरोग्य केंद्रांमध्ये त्यांचे वाटप करावे, अशी मागणी अथक सेवा संघाचे अध्यक्ष अनिल गलगली यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.   

Story img Loader