मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची घोषणा
राज्यातील निवडक आठ जिल्ह्यांमध्ये गेल्या वर्षी सुरू झालेली राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना आता उर्वरित २७ जिल्ह्यांमध्ये राबवण्याचा निर्णय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतला. सोमवारी सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीदरम्यान हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी, मुख्य सचिव जयंत कुमार बाँठिया, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. के. वेंकटेशन् आदी उपस्थित होते.
राज्यात अमरावती, नांदेड, धुळे, गडचिरोली, सोलापूर, रायगड, मुंबई व मुंबई उपनगर या आठ जिल्ह्यांमध्ये २ जुलै २०१२पासून राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू करण्यात आली होती. मात्र आता राज्यातील उर्वरित २७ जिल्ह्यांमध्ये आरोग्यपत्र निर्मिती व वितरण याबाबतची कार्यपद्धती सुरू झाली आहे. या अंतर्गत सध्या ८५ टक्के शिधापत्रिकांचे डाटा एण्ट्री व डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे. या योजनेसाठी आतापर्यंत राज्य शासनाने १६३ कोटी रुपये खर्च केले असून ५५ हजार रुग्णांना या योजनेचा लाभ झाला आहे.
या आठ जिल्ह्य़ांमध्ये योजना आधीच सुरू
राज्यात अमरावती, नांदेड, धुळे, गडचिरोली, सोलापूर, रायगड, मुंबई व मुंबई उपनगर या आठ जिल्ह्यांमध्ये २ जुलै २०१२पासून राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू करण्यात आली होती.

Story img Loader