मुंबईः महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश राज्य सरकारने नुकतेच दिले आहेत. राज्य लोकसवा आयोगाचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांचा कार्यकाल १९ सप्टेंबर रोजी संपल्यानंतर आयोगावर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष होते. नव्या अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रियाही राबविण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांच्या नियुक्तीवर महायुतीच्या नेत्यांचे एकमत झाले असून त्यानुसार सेठ यांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरु झाली होती. सेठ अखिल भारतीय पोलीस सेवेतून नियत वयोमानानुसार डिसेंबर रोजी निवृत्त होणार होते. मात्र व्हीआरएस घेऊन ते ते नव्या पदावर रुजू होतील. सेठ यांची लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यास पोलीस महासंचालकपदी कोणाची वर्णी लागणार याची चर्चा सुरू झाली. सध्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर असलेल्या आणि सर्व खटल्यांतून मुक्त झालेल्या रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालकपदी वर्णी लागू शकते.