शिवसेना खासदार संजय राऊत आणि पक्षाचे कोल्हापूर विभाग प्रमुख संजय पवार यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार उपस्थित होते. महाराष्ट्रातील सहा जागांसाठी १० जून रोजी मतदान होणार आहे.
शिवसेनेकडून संजय पवारांच्या नावाची घोषणा
शिवसेना खासदार संजय राऊत आणि पक्षाचे कोल्हापूर विभाग प्रमुख संजय “संजय पवार आणि मी गुरुवारी दुपारी १ वाजता राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत. मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र विकास आघाडीचे काही नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे सेनेच्या दुसऱ्या उमेदवाराची अधिकृत घोषणा करण्याची गरज नाही. पवारांच नाव फायनल झाले आहेत, असे राऊत यांनी बुधवारी पत्रकारांना सांगितले होते.
संभाजीराजे छत्रपतींची आशा मावळ्याचे चिन्ह
सेनेने दुसऱ्या उमेदवाराच्या घोषणेमुळे संभाजीराजे छत्रपतींची आशा मावळल्याचे चिन्ह दिसत आहे. संभाजीराजेंनी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. यासाठी त्यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याची मागणी केली होती. त्यानंतर संजय राऊत यांनी संभाजीराजेंनी शिवसेनेकडून निवडणूक लढवावी, अशी भुमिका घेतली होती. मात्र, संभाजी राजे आपल्या अपक्ष निवडणूक लढवण्याच्या भुमिकेवर ठाम होते. त्यानंतर शिवसेनेने आपल्या दुसऱ्या जागेसाठी संजय पवार यांच्या नावाची घोषणा केली होती.