आम आदमी पक्ष म्हणजे राजकारणातील ‘आयटम गर्ल’ अशी टीका लेखक चेतन भगत यांनी केल्यानंतर आता शिवसेनेनेही त्यांची री ओढली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ या वृत्तपत्रात आज केजरीवाल यांच्यावर तोंडसुख घेण्यात आले आहे. “केजरीवाल यांच्यापेक्षा राखी सावंतने उत्तम राज्य केले असते व जे लोक राखी सावंत हिची ‘आयटम गर्ल’ म्हणून हेटाळणी करतात त्यांनी आता राखीचा सन्मान केला पाहिजे. कारण केजरीवाल व त्यांचा ‘आप’ सगळ्यात बदनाम ‘आयटम गर्ल’ बनला आहे.” असे शिवसेनेने म्हटले आहे.
काल (गुरूवार) मुंबईत पार पडलेल्या शिवसनेच्या शक्तिप्रदर्शनाच्या कार्यक्रमात कॉंग्रेसवर प्रहार केल्यानंतर, आज (शुक्रवार) केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी देखिल लोकभावनाच बोलून दाखवली असल्याचे म्हणत, ‘केजरीवाल हा येडा मुख्यमंत्री आहे’, या विधानालाही शिवसेनेने पाठिंबा दिला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा