मुंबई : अभिनेत्री राखी सावंतची अंबोली पोलिसांनी गुरुवारी चौकशी केली. अभिनेत्री शर्लिन चोप्राबाबत आक्षेपार्ह वक्तव्ये केल्याचा तिच्यावर आरोप आहे. शर्लिन हिने तक्रार दाखल केली होती. राखी ही चौकशीसाठी उपस्थित राहत नसल्यामुळे तिला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘बिग बॉस १६’ च्या सुरुवातीला शर्लिन चोप्रा हिने दिग्दर्शक साजिद खान याला कार्यक्रमात सहभागी केल्याने नाराजी व्यक्त केली होती. साजिदने आक्षेपार्ह वागणूक दिल्याचा गंभीर आरोप तिने केला होता. तसेच त्याने अनेकांचे लैंगिक शोषण केल्याचासुद्धा आरोप केला होता. त्यानुसार अशा व्यक्तीला ‘बिग बॉस’सारख्या कार्यक्रमात राहण्याचा अधिकार नसल्याचे तिचे म्हणणे होते. दरम्यान, राखी सावंतने या प्रकरणात उडी घेत शर्लिनविरोधात वादग्रस्त वक्तव्ये केली होती.